शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

NASA: ‘चंद्रा’ची चमकदार कामगिरी! २ कोटी ८० लाख प्रकाशवर्ष दूर असलेला नवीन ग्रह शोधला; शास्त्रज्ञांचे मोठे यश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 10:00 AM

1 / 10
आपली आकाशगंगा प्रचंड आहे. ब्रह्मांड हे अनंत आहे. आपल्या सूर्यमालेप्रमाणे या अंतराळात शेकडो सूर्यमाला आणि पृथ्वीसारखे हजारो ग्रह असल्याचे सांगितले जात आहे. खगोलशास्त्रज्ञ नियमितपणे आकाशगंगेतील विविध ग्रह, तारे शोधून त्याचा अभ्यास करत असतात.
2 / 10
या संशोधनात अमेरिकेची नासा आघाडीवर असून, येथील शास्त्रज्ञांनी आणखी एक नवीन ग्रह शोधून काढला आहे. हा ग्रह पृथ्वीपासून तब्बल २ कोटी ८० लाख प्रकाशवर्ष दूर अंतरावर असलेला एक नवीन ग्रहाचा शोध लागला असून, खगोलशास्त्रज्ञांचे हे मोठे यश असल्याचे सांगितले जात आहे.
3 / 10
नासाच्या ‘चंद्रा’ या अवकाश दुर्बिणी मार्फत अवकाशाची निरीक्षणे १९९९ पासून सुरु आहेत. पृथ्वीभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत ही दुर्बिण भ्रमण करत आहे. अनंत अशा अवकाशातील एक्स रे – क्ष किरण स्त्रोतांचा म्हणजेच न्युट्रॉन तारे आणि कृष्णविवर यांचा अभ्यास या अवकाश दुर्बिणीमार्फत केला जातो.
4 / 10
भारतीय वंशाचे, नोबेल पुरस्कार सन्मानित, अमेरिकेतील प्रसिद्ध खगोल-भौतिक शास्त्रज्ञ एस सुब्रह्मण्यम यांच्या नावावरुन दुर्बिणीला ‘चंद्रा’ हे नाव नासाकडून देण्यात आले आहे. या दुर्बिणीमार्फत ‘Messier 51’ या दिर्घिकेच्या काही भागाची निरिक्षणे सुरु होती.
5 / 10
चंद्राने टिपलेल्या माहितीचे विश्लेषण सुरु असतांना नव्या ग्रहाचे अस्तित्व सापडल्याचा दावा अमेरिकेतील केंब्रिज विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. याबाबत एक अहवाल ‘नेचर’ या मासिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. शास्त्रज्ञांनी शोधलेला हा ग्रह शनी ग्रहाच्या आकाराएवढा असू शकतो, असा अंदाज बांधण्यात आला आहे.
6 / 10
M-51-ULS-1 हा न्युट्रॉन तारा आहे की, कृष्णविवर याबाबत चंद्रा दुर्बिणीने पाठवलेली निरिक्षणे अभ्यासली जात होती. तेव्हा M-51-ULS-1 या स्त्रोतातून येणारे क्ष किरण हे काही काळ क्षीण झाल्याची नोंद झाल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. म्हणजेच या स्त्रोताच्या समोरुन एखादी ग्रह सदृश्य गोष्ट गेली असावी असा अंदाज संशोधकांनी लावला.
7 / 10
ही निरिक्षणे पुन्हा पुन्हा पडताळून झाल्यावर संशोधकांची खात्री पटली की M-51-ULS-1 या स्त्रोताच्या भोवती शनीच्या आकाराचा एखादा ग्रह असावा. तेव्हा खगोलशास्त्राच्या इतिहासात पहिल्यांदाच आकाशगंगेबाहेर दुसऱ्या एखाद्या दिर्घिकेत ग्रहाचे अस्तित्व आढळून आले आहे.
8 / 10
आत्तापर्यंत विविध अवकाश दुर्बिणीमार्फत अवकाशाचे निरक्षणे सुरु होती आणि आहेत. यापैकी स्पिटझर, केप्लर, TESS अशा अवकाश दुर्बिणीमार्फत पृथ्वीसदृश्य ग्रह हे शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे. आत्तापर्यत कित्येक ग्रह हे माहिती झाले असून, यापैकी ३००० पेक्षा जास्त हे आपल्या पृथ्वीसारखे ग्रह आहेत असा शास्त्रज्ञांचा, संशोधकाचा दावा आहे.
9 / 10
हे सर्व ग्रह पृथ्वीपासून काही हजार प्रकाशवर्ष अंतरावर आहेत. अशा ग्रहांवर सजीवसृष्टी आहे का याचे अंदाज बाधले जात आहेत. आत्तापर्यंत आकाशगंगेतच अशा ग्रहांचा शोध लागला होता.
10 / 10
मात्र पहिल्यांदाच चंद्रा या अवकाश दुर्बिणीमार्फत आकाशगंगेबाहेर काही लाख प्रकाशवर्षे दूरच्या अंतरावरील एका दिर्घिकेत एका ग्रहाचे अस्तित्व हे माहिती झाले आहे. यानिमित्ताने क्ष किरण स्त्रोताजवळ ग्रहाचे अस्तित्व शोधण्याचा एका नवा मार्ग सापडल्याची भावना खगोल अभ्यासक आणि शास्त्रज्ञ यामध्ये व्यक्त होत आहे.
टॅग्स :NASAनासाscienceविज्ञानAmericaअमेरिका