शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आठ दिवसांसाठी गेलेल्या सुनीता विल्यम्स नऊ महिने अडकल्या; आता NASA किती पैसे देणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 15:01 IST

1 / 8
नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर ८ दिवसांच्या मोहिमेवर गेले होते. मात्र तांत्रिक समस्यांमुळे, ते ९ महिन्यांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अडकले होते.
2 / 8
आयएसएसवर अडकल्यामुळे, नासा या दोन अंतराळवीरांना मिशनसाठी निर्धारित कालावधीपेक्षा जास्त वेळ दिल्यास त्यांना अतिरिक्त पगार देणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
3 / 8
मात्र, नासामध्ये काम केलेल्या आणखी एका अंतराळवीराने हे दोघेही अंतराळ स्थानकावर अडकून पडल्याचे तथ्य नाकारलं आहे. ते दोघे तिथे अडकले नव्हते तर नासासाठी काम करत होते, असं अंतराळवीर कॅथरीन ग्रेस उर्फ ​​कॅडी कोलमन यांनी सांगितले.
4 / 8
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोघेही फेडरल कर्मचारी आहेत. त्यांचा अवकाशातील वेळ हा पृथ्वीवरील नियमित कामाच्या वेळेप्रमाणेच मानला जातो. या काळात त्यांना त्यांचा नियमित पगार मिळत राहतो. तर आयएसएस वरील त्यांच्या जेवणाचा आणि राहण्याचा खर्च नासा करते.
5 / 8
जास्त वेळ थांबावं लागल्याच्या मुद्द्यावर बोलताना कोलमन म्हणाल्या की, ही नासाच्या नियमित कर्मचाऱ्याप्रमाणे काम करत असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त पगार मिळणार नाही. त्यांना एक छोटासा दैनंदिन स्टायपेंड मिळतो. त्यांच्यासाठी अतिरिक्त भरपाई म्हणता येईल, जी नासा त्यांना त्यांच्या पगाराव्यतिरिक्त देते. हा स्टायपेंड फक्त ४ डॉलर म्हणजेच ३४७ रुपये दररोज आहे.
6 / 8
विल्यम्स आणि विल्मोर यांनी अवकाशात २८७ पेक्षा जास्त दिवस घालवले आहेत. त्यामुळे प्रत्येकाला फक्त १ हजार १४८ डॉलर्स म्हणजेच अंदाजे १ लाख रुपये अतिरिक्त भरपाई म्हणून मिळतील.
7 / 8
नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अमेरिकेच्या जनरल शेड्यूल सिस्टमच्या GS-१५ वेतन श्रेणीमध्ये येतात. GS-१५ अंतर्गत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना सुमारे १.०८ कोटी रुपये ते १.४१ कोटी रुपये वार्षिक पगार मिळतो.
8 / 8
नासा अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे अमेरिकेच्या जनरल शेड्यूल सिस्टमच्या GS-१५ वेतन श्रेणीमध्ये येतात. GS-१५ अंतर्गत येणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना सुमारे १.०८ कोटी रुपये ते १.४१ कोटी रुपये वार्षिक पगार मिळतो.
टॅग्स :Sunita Williamsसुनीता विल्यम्सAmericaअमेरिकाNASAनासा