nasa space astronauts grows chili pepper in space and makes tacos with it
अंतराळात उगवली तिखट हिरवीगार मिरची, अंतराळवीरांनी त्यापासून बनवली 'ही' डिश... By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2021 5:56 PM1 / 10अमेरिकेची (USA)अंतराळ संशोधन संस्था नासाच्या (NASA) आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर भाज्या (Vegetables) पिकवण्याचा प्रयोग यशस्वी झाला असून, अंतराळवीरांनी खाण्यापिण्याच्याबाबतीतही काही प्रयोग केले आहेत..2 / 10नुकतेच याबाबतचे काही फोटो आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर गेलेल्या नासाच्या अंतराळवीर मेगन मॅकआर्थर (Megan Mcarthur) यांनी शेअर केले आहेत. 3 / 10त्यामुळे अंतराळातील आयुष्य कसं असतं, अंतराळवीर अंतराळ यानात कसे राहतात, काय खातात याबद्दलचे सामान्य माणसाचे कुतूहल शमण्यास मदत झाली आहे.4 / 10मेगन मॅकआर्थरने शेअर केलेल्या फोटोमध्ये रोटीसारखा एक पदार्थ (Food) हवेत उडताना दिसत असून, त्यात काही भाज्या असल्याचे दिसत आहे.5 / 10हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. ट्विटरवर हा फोटो शेअर करताना मेगन मॅकआर्थरने लिहिलं आहे की, पीक कापणीनंतर आम्हाला लाल आणि हिरव्या मिरच्यांचा (Chilli) आस्वाद घेता आला आहे. आम्ही सर्वोत्तम स्पेस टॅको (मेक्सिकन खाद्यपदार्थ) बनवले आहे.6 / 10यात उल्लेख केलेल्या मिरच्या अंतराळात उगवण्यात आल्या आहेत. या मिरच्या शिमला मिरचीसारख्या आहेत.7 / 10पृथ्वीपासून इतक्या अंतरावर उगवलेल्या या पिकाचं यश साजरं करण्यासाठी अंतराळवीरांनी एक टॅको पार्टी (Taco Party) केली. त्यावेळचे हे फोटो आहेत.8 / 10अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने चार महिन्यात अंतराळात मिरचीचे रोप तयार करून मिरची पिकवली आहे. न्यू मेक्सिकोच्या हॅच व्हॅलीमध्ये (New Mexico Hatch Valley) शोध लागलेल्या एस्पॅनोला जातीच्या मिरचीपासून हे मिरचीचे पीक घेण्यात आले आहे.9 / 10मिरची हिरव्या आणि लाल अशा दोन्ही रंगाची असते. मात्र अंतराळात मिरची पिकवणं हे इतर पिकांच्या तुलनेत अवघड असल्याचं नासानं म्हटलं आहे. 10 / 10अंतराळात मिरचीशिवाय चायनीज कोबी, रशियन केल, लेट्युसही पिकवण्यात यश आलं आहे. मेगन मॅकआर्थर एप्रिल 2021 पासून अंतराळात असून, अंतराळात उगवलेल्या वनस्पतींमध्ये हिरवी मिरची हे सर्वात नवीन पीक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications