nasa spacex first splashdown of american astronauts in 45 years dragon
४५ वर्षांनंतर नासाच्या अंतराळवीरांची स्पेसएक्स ड्रॅगनमधून पाण्यात लँडिंग By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2020 9:33 AM1 / 10स्पेसएक्सच्या मदतीने अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने 45 वर्षानंतर आपल्या दोन अंतराळवीरांचे पाण्यात लँडिंग केले. हे दोन्ही अंतराळवीर स्पेसएक्सच्या क्रू ड्रॅगन स्पेसक्राफ्टमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवरून (आयएसएस) परत येत होते. फ्लोरिडाच्या पेंसाकोला जवळील मेक्सिकोच्या खाडीमध्ये हे लँडिंग करण्यात आले.2 / 10अमेरिकेच्या फ्लोरिडा शहरातील पेंलाकोला किनाऱ्याजवळ मेक्सिकोच्या खाजीमध्ये नासा-स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सूल लँडिंग झाले. या ड्रॅगन स्पेसक्राफ्टमध्ये अंतराळवीर रॉबर्ट बॉब बेनकेन आणि डग्लस हर्ले होते. नासा आणि स्पेसएक्सने लँडिंगसाठी सात बंदरे निवडली होती. पेंसाकोला, टैंपा, टालाहॅसी, पनामा सिटी, केप कॅनरेव्हल, डेटोना आणि जॅक्सनविले. जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत कोठेही लँडिंग करता येईल.3 / 10ज्यावेळी स्पेसक्राफ्ट आयएसएसकडून परत येण्याची तयारी करत असेल, त्यावेळी लँडिंग कोठे करायचे याचा निर्णय घेतला जातो. आयएसएसकडून ड्रॅगनची बाहेर पडण्याची तारीख आणि वेळ, पृथ्वीवरील लँडिंग साइट आणि कोणत्या मार्गाने त्याला पाठविले, याची माहिती दिली जाते. तसेच, पृथ्वीवरील हवामान देखील पाहिले जाते. जेणेकरून लँडिंगच्या वेळी समुद्रामध्ये वादळ होणार नाही. 4 / 10आयएसएसवरून पृथ्वीवर येण्यासाठी बॉब बेनकेन आणि डगलस हर्ली यांना अवकाशात 19 तास प्रवास करावा लागला. यावेळी, त्यांनी पृथ्वीची कक्षा बदलली जेणेकरून ड्रॅगन योग्य मार्गावर येऊ शकेल. ड्रॅगनची ट्रंक पृथ्वीच्याजवळच्या कक्षात येण्यापूर्वीच अवकाशात सोडण्यात आली. यानंतर, ते वेगाने पृथ्वीच्या दिशेने येऊ लागले. याला सुमारे 12 मिनिटे लागली. 5 / 10त्यानंतर पृथ्वीच्या वातावरणामध्ये येण्याची सुरुवात सुमारे 100 किलोमीटर वर होती. येथे स्पेसक्राफ्ट घर्षणामुळे आगीच्या गोळ्यात बदलते. परंतु उष्णतेच्या शील्डमुळे, अंतराळवीर ड्रॅगनच्या आत सुरक्षित असतात. हे सुमारे 6 मिनिटे चालते. यावेळी, स्पेसक्राफ्टचा संपर्क होत नाही.6 / 10यानंतर, ड्रॅगनचे दोन छोटे पॅराशूट ताशी 645 किलोमीटर वेगाने खाली येत, ते 18 हजार फूट उंचीवर उघडतात.7 / 10 ज्याचा वेग 177 किमीपर्यंत कमी होतो. यानंतर, ड्रॅगनचे चार मोठे पॅराशूट 6500 फूटांवर उघडतात, ज्यामुळे त्याचा वेग ताशी 35 किलोमीटरपर्यंत कमी होतो. पाण्यात उतरण्यासाठी हा वेग अतिशय योग्य आहे.8 / 10दरम्यान, जेव्हा ड्रॅगन कॅप्सूल पृथ्वीच्या वातावरणामध्ये येतो तेव्हा त्याची गती ताशी सुमारे 28,163 किलोमीटर असते. 9 / 10कॅप्सूलचे बाह्य तापमान सुमारे 1926 डिग्री सेल्सियस असते. पृथ्वीचे वातावरण पार करण्यास सुमारे 6 मिनिटे लागतात. हा काळ खूप महत्वाचा आणि गंभीर असतो.10 / 10 सर्व फोटो - एएफपी / नासा / स्पेसएक्स) आणखी वाचा Subscribe to Notifications