Nasa warns about asteroid bigger than london eye approaching close to earth
अंतराळात मोठी हालचाल; पृथ्वीच्या दिशेने वेगात येतंय संकट; नासाकडून धोक्याचा इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 2:52 PM1 / 7२०२० या वर्षात देश आणि जगभरात कोरोनानं हाहाकार माजवला आहे तर देश आणि जगातील वैज्ञानिकांनी फक्त देश आणि जगात नव्हे तर २०२० मध्ये अंतराळातही खळबळ उडाली आहे.2 / 7नासाने याबाबत इशारा जारी केला आहे, यावर्षी सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण व्यतिरिक्त अंतराळात अनेक उलथापालथ होत आहेत. दर दोन दिवसांनी अंतराळात अजबगजब हालचाली पाहायला मिळत आहेत. 3 / 7अंतराळ संस्था नासाने नवीन अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे एक मोठ्या आकाराचा ग्रह वेगाने पृथ्वीच्या दिशेने येत असल्याचं सांगण्यात आलं आहे. 4 / 7हा ग्रह लंडन आय(London Eye) पेक्षाही दीडपटीने मोठा आहे. यूनाइटेड किंगडममधील लंडन आयची उंची ४४३ फूट इतकी आहे, म्हणजे हा ग्रेह जवळपास त्याच्या ५० पटीने मोठा आहे. 5 / 7अंतराळ संस्था नासाने या ग्रहाला Asteroid 2020ND असं नाव दिलं आहे. हा ग्रह पृथ्वीसाठी धोकादायक ठरु शकतो अशी भीती नासाने व्यक्त केली आहे. 6 / 7२४ जुलै २०२० हा ग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. हा ग्रह पृथ्वीच्या 0.034 AU(Astronomical Unit) रेंजमध्ये आतमध्ये येईल. एक एस्ट्रोनॉमिकल यूनिट १५० मिलियन किमीएवढा असतो, म्हणजे सूर्य आणि पृथ्वीमधील इतकं अंतर असते. 7 / 7संभाव्य धोकादायक ग्रहाला अवकाश शास्त्रज्ञ पृथ्वीच्या जवळ येणार्या धोक्यांप्रमाणे मोजले जाणाऱ्या घटकात समाविष्ट करतात. म्हणूनच 0.05 AU किंवा त्याहून कमी अंतरावर (एमओआयडी) सर्व ग्रह संभाव्य धोकादायक मानले जातात. आणखी वाचा Subscribe to Notifications