शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

कंगाल पाकिस्तानच्या हाती लागला खजिना; सैन्यानं साथ दिली तर होईल मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 9:08 PM

1 / 7
गरिबीच्या उंबरठ्यावर असलेल्या पाकिस्तानच्या हाती खजिना लागला आहे. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात नैसर्गिक वायूचा मोठा साठा सापडला आहे.हा पाकिस्तानचा सर्वात मोठा नैसर्गिक वायूचा साठा असल्याचेही बोलले जात आहे.
2 / 7
पाकिस्तानी लष्कराने या गॅस साठ्याकडे लक्ष दिले नाही तर सतत गॅस टंचाईने त्रस्त असलेल्या जनतेला मोठा दिलासा मिळू शकतो. स्थानिक वृत्तानुसार, नैसर्गिक वायूचा हा प्रचंड साठा सिंध प्रांतातील सजावल जिल्ह्यात सापडला आहे.पाकिस्तान पेट्रोलियम लिमिटेडने झुम पूर्व ठिकाणच्या शाह बंदरमध्ये २५४५ मीटर खोलीपर्यंत ड्रिलिंग ऑपरेशन केले तेव्हा या वायूचा साठा सापडला.
3 / 7
पाकिस्तान पेट्रोलियम लिमिटेड (पीपीएल) ने अहवाल दिला की, प्राथमिक चाचणी दरम्यान वेलहेड फ्लो प्रेशर १२.६९ मिलियन मानक घनफूट नोंदवले गेले. या काळात २३६ बॅरल संभाव्य उत्पादनही झाले. तज्ञांच्या देखरेखीखाली चालू असलेल्या ड्रिलिंगचा उद्देश या नवीन संसाधनाच्या पूर्ण क्षमतेचा शोध घेणे आणि त्याचा फायदा घेणे हे आहे.
4 / 7
पीपीएलच्या प्रवक्त्याने या शोधाच्या सकारात्मक परिणामावर भर दिला, ते म्हणाले की आम्ही हायड्रोकार्बन साठा वाढवण्यास हातभार लावू आणि देशाच्या तेल आणि वायू क्षेत्रावर परिणाम करणार्‍या ऊर्जा संकटाला दूर करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल.
5 / 7
शाह बंदर विहीर खोदण्याच्या या प्रक्रियेत पाकिस्तान पेट्रोलियम लिमिटेडला मुरी पेट्रोलियम, सिंध एनर्जी होल्डिंग आणि सरकारी होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड यांचे सहकार्य मिळत आहे. पाकिस्तान सध्या वाढत्या व्यापाराशी झुंजत आहे ज्याचं मुख्य कारण म्हणजे देशातील ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी तेल आणि गॅस मोठ्या प्रमाणात आयात करावी लागतेय. अशावेळी हा शोध महत्त्वपूर्ण मानला जातो.
6 / 7
भारत आणि चीनसारख्या देशांप्रमाणे पाकिस्तान गरजेनुसार तेल आणि वायू खरेदी करतो. त्यामुळे ऊर्जा निर्यात करणाऱ्या देशांकडून पाकिस्तानला महागड्या किमतीत तेल आणि वायू मिळतो.
7 / 7
त्याच वेळी भारत आणि चीन या देशांकडून दीर्घकालीन खरेदीसाठी करार करतात,ज्यामुळे त्यांना किंमतींमध्ये फायदा होतो.पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या कारभाराची मोठी किंमत गरीब जनतेला चुकवावी लागली आहे. यामुळे तेल आणि वायूच्या किमती तर वाढतातच,पण महागाईही वाढते.
टॅग्स :Pakistanपाकिस्तान