शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Necklace Nebula: गूढ आणि तितकाच अद्भूत! अंतराळात अवतरला हिऱ्यांचा हार, पाहून व्हाल गार...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2021 3:28 PM

1 / 10
अंतराळात नष्ट होणारे दोन तारे एकमेकांसोबत किती सुंदर दिसतात, ती प्रक्रिया या हारावरून समजते.
2 / 10
काळ्या बॅकग्राऊंडमध्ये दिसणारा हा गॅसच्या फुग्यांनी सजलेला हार पृथ्वीपासून थोडाथोडका नव्हे तर 15 हजार प्रकाश वर्षे दूर आहे.
3 / 10
Sagitta नावाच्या मंडळामध्ये असलेला हा Nebula हिऱ्यांच्या हारासारखा दिसतो. याच्या आकारामुळेच Necklace nebula असे नाव देण्यात आले आहे.
4 / 10
या मनमोहक नेकलेस नेब्युलाचा फोटो हबल दुर्बिनीने खेचला आहे. सूर्यासारखे दोन तारे Necklace nebula बनवितात. याला PN G054.203.4 असे शास्त्रिय नाव आहे.
5 / 10
नासानुसार एखादा तारा फुटला की अशाप्रकारचा Nebula बनतो. फोटोत दिसणारा नेब्युला रिंगसारखा दिसत असला तरी देखील तो 12 अब्ज मैल एवढ्या आकारात पसरलेला आहे.
6 / 10
तारे फुटल्यावर त्यातून होणाऱ्या स्फोटामुळे गॅस बाहेर पडतो. हा गॅस एकत्र आल्यावर चमकू लागतो. यानंतर तो एखाद्या हिऱ्याच्या हारासारखा भासू लागतो.
7 / 10
नेब्युला खरेतर एक अंतराळातील विशाल ढग असतो. यामध्ये धूळ आणि गॅस असतो. काही नेब्युला हे नष्ट होणाऱ्या ताऱे फुटल्याने निघणाऱ्या गॅस आणि धुळीपासून बनतात. जसे की सुपरनोव्हा.
8 / 10
तर काही नेब्युला हे तारे जिथे निर्माण होतात, म्हणजेच ताऱ्यांचे जन्मस्थळ असतात. या कारणामुळे काही नेब्युलाना 'स्टार नर्सरी' म्हटले जाते. हे नेब्युला खास आकारात आढळतात. जसे की, गरूडाचा आकार किंवा फुलपाखरांच्या आकारात आढळतात.
9 / 10
हा फोटो आधी देखील घेतला गेला आहे. मात्र, आताचा फोटो अद्ययावत प्रोसेसिंग टेक्निकच्या मदतीने तयार करण्यात आला आहे.
10 / 10
हा फोटो हबलच्या वाईड फील्ड कॅमेरा 3 च्या वेगवेगळ्या फोटोंना एकत्र करून बनविण्यात आला आहे.
टॅग्स :NASAनासा