शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Nepal Plane Crash: क्रॅश होताच बेचिराख झाले विमान, आकाशात उठले आगीचे लोळ, नेपाळमधील अपघाताचे भयावह फोटो समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 2:49 PM

1 / 6
नेपाळमधील पोखरा येथे आज एक मोठा विमान अपघात झाला. या विमानामध्ये ६८ प्रवासी होते. नेपाळचे लष्कर, सशस्त्र पोलीस, नेपाळ पोलिसांसोबत स्थानिक नागरिक मिळून बचाव कार्य करत आहेत.
2 / 6
नेपाळमधील पोखरा येथे आज एक मोठा विमान अपघात झाला. या विमानामध्ये ६८ प्रवासी होते. नेपाळचे लष्कर, सशस्त्र पोलीस, नेपाळ पोलिसांसोबत स्थानिक नागरिक मिळून बचाव कार्य करत आहेत.
3 / 6
मिळालेल्या माहितीनुसार यती एअरलाइन्सचे एटीआर-७२ विमानाने काठमांडू येथून पोखराच्या दिशेने उड्डाण केले होते. या ७२ सिटर विमानामध्ये ६८ प्रवासी होते. तर ४ क्रू मेंबर्स होते. असे एकूण ७२ जण या विमानामध्ये होते.
4 / 6
हे विमान पोखरा येथे पोहोचले असताना अचानक क्रॅश झाले. नेपाळी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार हा अपघात पोखरा येथील जुना डोमॅस्टिक विमानतळ आणि पोरखरा आंतरराष्ट्रीय विमानतळ यांच्या दरम्यान झाला.
5 / 6
काठमांडू पोस्टने दिलेल्या माहितीनुसार यती एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बरतोला यांनी सांगितले की, विमानामध्ये ६८ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. आतापर्यंत ३२ जणांचे मृतदेह सापडले आहेत. हा अपघात आज सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी झाला. या अपघातानंतर हे विमान पोखरा खोऱ्यातील सेती नदीच्या दरीत कोसळले.
6 / 6
नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांनी अपघाताबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. पंतप्रधान प्रचंड यांनी सर्व सरकारी यंत्रणांना प्रभावी बचावकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच त्यांनी अपघाताबाबत कॅबिनेटची आपातकालीन बैठक बोलावली आहे.
टॅग्स :NepalनेपाळairplaneविमानAccidentअपघात