शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नेदरलँडमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन; ग्लास केबिनमध्ये करता येणार डिनर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2020 2:15 PM

1 / 12
जगभरातील लॉकडाऊनमुळे लोकांना घरातच राहावे लागत आहे. काही देशांनी लॉकडाऊन शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. नेदरलँडमध्ये या साथीच्या रोगाची तीव्रता कमी झाल्यानंतर काही रेस्टॉरंट्सही उघडण्यात आली आहेत.
2 / 12
व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता रेस्टॉरंटच्या मालकांनी एक अनोखा प्रयोग केला आहे. इथल्या एका रेस्टॉरंटने लोकांना संसर्गापासून वाचवण्यासाठी अनोखा मार्ग अवलंबला आहे.
3 / 12
रेस्टॉरंटमध्ये लोकांसाठी छोटे काचेचे केबिन तयार केले गेले आहेत. जर तुमचा विश्वास नसेल तर मग स्वतःच हे फोटो बघा.
4 / 12
नेदरलँड्सची राजधानी अॅम्सटरडॅम येथे हे रेस्टॉरंट आहे, ज्याचे नाव मीडियॉटिक ईटीएन आहे.
5 / 12
येथे बसलेल्यांसाठी एक लहान काचेची केबिन बनविण्यात आली आहे, ज्यात दोन लोक सहजपणे बसू शकतात आणि रात्रीच्या जेवणाचा आनंद घेऊ शकतात.
6 / 12
रेस्टॉरंटचे वेटर त्यांच्या हातात हातमोजे आणि चेह-यावर मास्क लावून जेवण देतात. यावेळी सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करण्यासाठी टेबलावर एक लांब बोर्डही ठेवण्यात आला आहे.
7 / 12
ज्यावर वेटर अन्न किंवा इतर वस्तू दूरवर ठेवतात, जेणेकरून लोकांशी त्यांचा शारीरिक संपर्क येणार नाही.
8 / 12
अशा जेवणाच्या काचेच्या कॅबिनचे प्रयोग अजूनही रेस्टॉरंट्समध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबवले जात आहेत. रेस्टॉरंट मालकांचे म्हणणे आहे की, व्हायरसमुळे नेदरलँड्समधील काही रेस्टॉरंट्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
9 / 12
रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या लोकांसाठी ग्लास केबिन बनविण्यात आले आहे. अशा परिस्थितीत ग्राहकांना कशा पद्धतीनं चांगल्या सेवा देता येतील, याचा आम्ही अभ्यास करत आहोत.
10 / 12
रेस्टॉरंटमध्ये काचेच्या केबिनमध्ये बसलेल्या ग्राहकांना डिनरमध्ये शाकाहारी मेनू देण्यात येत आहे. ही सेवा नुकतीच चाचपणी म्हणून सुरू केली गेली आहे. तसेच कर्मचार्‍यांच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रांनाही ही सेवा दिली जात आहे.
11 / 12
रेस्टॉरंटच्या वेबसाइटनुसार, या काचेच्या केबिनची सर्व आरक्षणे आधीच बुक केली गेली आहेत. 21 मे रोजी रेस्टॉरंटसाठी सार्वजनिक योजना आखण्यात आल्या आहेत. ही काचेची घरे दोन लोकांसह बसून रात्रीचे जेवण करण्यासाठी डिझाइन केलेली आहेत.
12 / 12
नेदरलँड्सच्या रेस्टॉरंट असोसिएशनचे म्हणणे आहे की, सध्या देशात मर्यादित संख्येने रेस्टॉरंट उघडण्याची परवानगी आहे. अशा परिस्थितीत संसर्ग टाळण्यासाठी अशा प्रकारचा पुढाकार घेणे आवश्यक आहे, जेणेकरून व्यवसायाचे नुकसान होणार नाही.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या