शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बापरे! आणखी खतरनाक होतोय कोरोना?; नवा स्ट्रेन आढळल्याने चिंता वाढली; धडकी भरवणारी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 1:11 PM

1 / 15
कोरोना व्हायरसने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरातील रुग्णांच्या संख्येने तब्बल दहा कोटींचा टप्पा पार केला आहे.
2 / 15
कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. व्हायरसवर रिसर्च सुरू असून अनेक ठिकाणी संशोधकांना यश आले आहे. मात्र याच दरम्यान कोरोनाबाबत धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे.
3 / 15
जवळपास एक वर्षापासून जगभरात कोरोना व्हायरसचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी शास्त्रज्ञांकडून प्रयत्न सुरू आहेत. अनेक देशांमध्ये लसीकरणाची मोहीम सुरू झाली आहे.
4 / 15
कोरोना लसीचे काही साईड इफेक्ट देखील समोर आले आहेत. तर काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आल्याने प्रशासनाच्या चिंतेत भर पडली होती.
5 / 15
कोरोनाचाच संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असतानाच आता अर्जेंटिनामध्ये व्हायरसचा आणखी एक नवा स्ट्रेन आढळला आहे. रशियन वृत्तसंस्था स्पुटनिकने अर्जेंटिनामध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळल्याची माहिती दिली आहे.
6 / 15
अर्जेंटिनाचे आरोग्य मंत्री जिनीज गार्सिया यांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. या नव्या स्ट्रेनबाबत फारशी माहिती समोर आली नाही. गार्सिया यांनी याबाबत ट्विट केलं आहे. तसेच आढळलेला पी1 आणि रिओ डि जनेरोमध्ये आढळलेला पी2 स्ट्रेनदेखील अर्जेंटिनामध्ये आढळले आहेत.
7 / 15
कोरोनाच्या काळात कोरोना व्हायरस जवळपास हजारवेळा म्यूटेट झाला असल्याचं समोर आलं आहे. मात्र कोरोनाच्या तीन व्हेरिएंटबाबत शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. हे तीन व्हेरिएंट वेगाने संसर्ग फैलावतात.
8 / 15
ब्रिटन, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये आढळलेल्या स्ट्रेनचा यामध्ये समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या संसर्गावर लसीचाही परिणाम होत नसल्याचं समोर आल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
9 / 15
करोनाच्या नव्या स्ट्रेनवर ही लस फारशी प्रभावी ठरत नसल्याचे समोर आल्यानंतर लसीचा वापर थांबवण्याचा निर्णय काही ठिकाणी घेण्यात आला आहे. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
10 / 15
जॉन्सन अँड जॉन्सन आणि नोवावॅक्सने आपली लस कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर प्रभावी नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तर, मॉडर्ना नव्या स्ट्रेनसाठी बुस्टर शॉट विकसित करत आहे. फायजर-बायोएनटेकची लसही कमी प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
11 / 15
चीनच्या वुहानमधून कोरोनाचा प्रसार झाल्याचं म्हटलं गेलं. त्यानंतर कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात चीनला बऱ्यापैकी यश आलं. मात्र आता पुन्हा एकदा चीनमध्ये कोरोनाचं संकट आलं आहे.
12 / 15
चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार होत असल्याची माहिती समोर आली आहे. काही शहरांमध्ये गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आता आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे.
13 / 15
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने रविवारी दिलेल्या माहितीनुसार, चीनमध्ये 30 जानेवारी रोजी कोरोनाचे 92 नवे रुग्ण आढळून आले आहेत. 24 जानेवारीनंतर एका दिवसात आढळून येणाऱ्या रुग्णांचा आकडा हा जास्त आहे.
14 / 15
नव्या रुग्णांमध्ये 73 केसेस या लोकल ट्रान्समिशनच्या आहेत. जेलिन प्रांतातील टोंगुआ शहरात कोरोनाचे सर्वाधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दुसरीकडे बीजिंग आणि शांघाईमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नसल्याची माहिती मिळत आहे.
15 / 15
चीनमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोना व्हायरस नेमका कोठून आला, याचा शोध घेण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या एका पथकाने वुहानमध्ये अन्य एका रुग्णालयाला भेट दिली.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस