new swine flu strain with pandemic potential was found circulating in Chinese pigs
भय इथले संपत नाही! चीनमध्ये सापडला नवा व्हायरस; संपूर्ण जगात खळबळ By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2020 8:07 AM1 / 10संपूर्ण जगात कोरोनानं थैमान घातलं आहे. चीनमधून पसरलेल्या कोरोनामुळे अनेक देशांमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जगातील कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीच्या पुढे गेली असून मृतांचा आकडा ५ लाखांहून अधिक आहे.2 / 10संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत असताना आता चिनी वैज्ञानिकांना एक नव्या प्रकारचा फ्लू सापडला आहे. हा फ्लू कोरोना विषाणूप्रमाणेच मोठी महामारी पसरवू शकतो.3 / 10चिनी वैज्ञानिकांनी विषाणूला G4 EA H1N1 असं शास्त्रीय नाव दिलं आहे. हा विषाणू डुकरामध्ये सापडला आहे. हा विषाणू डुकरांमधून माणसांच्या शरीरात प्रवेश करू शकतो, अशी माहिती संशोधनातून समोर आली आहे.4 / 10डुकरांच्या शरीरात सापडलेला विषाणू माणसापर्यंत पोहोचू शकतो आणि त्यानंतर तो लगेच त्याच्या संपर्कात येणाऱ्या माणसांना संक्रमित करू शकतो, अशी भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.5 / 10एखाद्या विषाणूच्या प्रसारासाठी, त्याचा संसर्ग होण्यासाठी आवश्यक असलेली सर्व लक्षणं डुकरामध्ये सापडलेल्या विषाणूमध्ये असल्याची माहिती वैज्ञानिकांनी दिली. त्यामुळे आता जगासमोर नवा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.6 / 10याआधी २००९ मध्ये जगात फ्लू पसरला होता. त्या फ्लूला स्वाईन फ्लू म्हटलं गेलं होतं. मेक्सिकोमधून हा फ्लू पसरला. मात्र तो तितकासा धोकादायक नव्हता. 7 / 10स्वाईन फ्लूचा विषाणू फारसा धोकादायक नसल्यानं वृद्ध व्यक्तींनीदेखील त्याचा सामना केला. मात्र चीनच्या वैज्ञानिकांना डुकरांमध्ये सापडलेला विषाणू जास्त घातक आहे.8 / 10चीनमध्ये आढळून आलेला विषाणू जवळपास आधीच्या फ्लूसारखाच आहे. मात्र त्यात काही बदल झाले आहेत. या विषाणूमुळे सध्याच्या घडीला तरी धोका नाही. मात्र त्यावर लक्ष ठेवून राहावं लागेल, असं वैज्ञानिकांनी सांगितलं.9 / 10नव्या G4 EA H1N1 विषाणूमध्ये आपल्या पेशी कित्येक पटीनं वाढवण्याची क्षमता आहे. त्यामुळे सध्या फ्लूवर उपलब्ध असलेली लस G4 EA H1N1 विषाणूला रोखण्याच्या कामी येणार नाही.10 / 10सध्या जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे आम्ही संभाव्य धोक्यावर नजर ठेवून आहोत, अशी माहिती प्राध्यापक किन चो चांग यांनी दिली. आणखी वाचा Subscribe to Notifications