New Wave Of Coronavirus Is Coming Us Scientists Raise Alarm On Ba2 Omicron Who Warns Of Xe Variant
कोरोनाची नवी लाट येतेय! BA.2 ओमायक्रॉनमुळे अमेरिकेत टेन्शन, नव्या XE व्हेरिअंटबाबत WHO नं दिला इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2022 12:43 PM1 / 11अमेरिकन आरोग्य तज्ज्ञांनी कोरोना विषाणूच्या BA.2 Omicron व्हेरिअंटबाबत धोक्याची घंटा व्यक्त केली आहे. चीन, हाँगकाँगसह युरोप आणि आशियातील अनेक देशांमध्ये जी लाट आली आहे ती फक्त BA.2 या व्हेरिअंटमुळेच आली आहे. अनेक यूएस तज्ज्ञांनी ओमायक्रॉन या अत्यंत संसर्गजन्य व्हेरिअंटबद्दल म्हटलं आहे की हा व्हेरिअंट पुढील कोरोना लाटेचं कारण बनू शकतो.2 / 11BA.2 व्हेरिअंटमुळे कोरोना रुग्णांमध्ये फारशी वाढ होणार नाही, अशी आशा अमेरिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामागील तर्क असा आहे की, गेल्या वर्षी अनेकांना मूळ ओमायक्रॉनची लागण झाली होती, लसीकरणही झालं आहे, त्यामुळे त्यांना गंभीर आजारापासून प्रतिकारशक्ती मिळेल. तरीही, तज्ज्ञांनी काही कारणं सांगितली आहेत ज्यामुळे BA.2 ची लाट घातक ठरू शकते.3 / 11त्याच वेळी, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) शास्त्रज्ञांनी नोंदवलं आहे की अनेक ठिकाणी ओमायक्रॉनच्या व्हेरिअंटमध्ये उत्परिवर्तन आढळून आलं आहे, ज्यामुळे ते अधिक धोकादायक आणि सांसर्गिक देखील आहे. त्याला XE स्ट्रेन असं नाव देण्यात आलं आहे.4 / 11६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ७०% पेक्षा कमी अमेरिकन लोकांना पहिला बूस्टर डोस मिळाला आहे, म्हणजे मोठ्या लोकसंख्येला धोका आहे. कॅलिफोर्नियातील एका संशोधन संस्थेतील मोलेक्युलर मेडिसिनचे प्राध्यापक डॉ. एरिक टोपोल यांनी वस्तुस्थिती मांडली. रोगप्रतिकारशक्ती कमी होत असताना ज्यांना बूस्टर डोस मिळाला, त्यांची प्रतिकारशक्ती आता कमी होऊ लागली असेल.5 / 11जे नैसर्गिक प्रतिकारशक्तीवर अवलंबून असतात त्यांनी BA.2 Omicron बाबत अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे कारण ते सहजपणे त्यात प्रवेश करू शकतं. निष्काळजीपणाचा होण्याचा धोका देखील आहे कारण लोक जवळजवळ अडीच वर्षांपासून मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून थकले आहेत.6 / 11Omicron चा BA.2 व्हेरिअंटचा धोका असताना, XE नावाचा दुसरा व्हेरिअंट आला आहे. हा BA.2 पेक्षा १० पट जास्त संसर्गजन्य असल्याचं म्हटलं जातं. नवीन रूप पाहता, बूस्टर डोसची गती वाढवण्याची गरज आहे. दरम्यान, केंद्राशी संलग्न संस्था ICMR म्हणतं की कोविड लसींचे बूस्टर डोस सर्व प्रौढांना दिलं जावं, कारण दोन डोसमधून शरीरात तयार होणारे प्रतिपिंड आठ महिन्यांनंतर लक्षणीयरीत्या कमी होतात. दोन वेगवेगळे डोस घेतल्यास त्यातून निर्माण होणारी प्रतिकारशक्ती अधिक प्रभावी ठरते, असंही संस्थेचं म्हणणं आहे.7 / 11जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार, ओमायक्रॉनचा नवीन XE व्हेरिअंट आला आहे, जो BA.2 पेक्षा 10 पट जास्त संसर्गजन्य आहे. दरम्यान या दाव्याला आणखी पुष्टी आवश्यक आहे. हा प्रकार ओमायक्रॉनच्या BA.1 आणि BA.2 या दोन उपरेखांनी बनलेला आहे.8 / 11ब्रिटनमध्ये १९ जानेवारी रोजी हा व्हेरिअंट प्रथम आढळला होता, असं WHO ने या आठवड्याच्या सुरुवातीला प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. तेव्हापासून या प्रकाराचे ६०० हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. हा व्हेरिअंट फ्रान्स, डेन्मार्क आणि बेल्जियममध्येही आढळून आला आहे.9 / 11अहवालानुसार, या नवीन XE स्ट्रेनची उत्पत्ती ओमिक्रॉनच्या दोन स्ट्रेनच्या उत्परिवर्तन आणि संयोगातून झाली आहे. जागतिक स्तरावर सध्या त्याचे रुग्ण कमी असले तरी अभ्यासात ज्याप्रकारे त्याचे संक्रामक असं वर्णन केलं जात आहे, अशा परिस्थितीत यामुळे समस्या वाढू शकतात.10 / 11प्राथमिक अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार स्टिल्थ ओमायक्रॉनपेक्षा १० टक्के वेगानं वाढू शकतो आणि संसर्ग पसरवू शकतो, जे आतापर्यंत सर्वात संसर्गजन्य मानलं जात आहे. तज्ज्ञांच्या मते, कोरोनाचा वाढता धोका पाहता सर्व देशांनी सतर्क राहायला हवं11 / 11ओमायक्रॉनमधून आतापर्यंत तीन संकरित किंवा मिश्रित प्रकार XD, XE, XF आढळले आहेत. पहिले दोन डेल्टा आणि ओमायक्रॉनचे संयोजन आहेत, तर तिसरा ओमिक्रॉनच्या दोन उप-प्रकारांचा हायब्रिड स्ट्रेन आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications