Next Pakistan Army Chief: अस्तनीतला साप! ज्याने लष्करप्रमुख बनवले त्यालाच घालवले; दोन पंतप्रधान बदलून बाजवा निवृत्त होणार By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 6:48 PM
1 / 10 पाकिस्तानात गेल्या महिन्याभरापासून सत्तांतराच्या वादळाने धुमाकुळ घातला होता. यात भल्याभल्यांची विकेट घेणाऱ्या इम्रान खानचीच विकेट पडली होती. पाकिस्तान लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी त्यांची विकेट घेतली होती. आता शाहबाज शरीफ यांना त्यांनी पंतप्रधान पदावर बसविले आहे. 2 / 10 पाकिस्तानात नेहमी लष्कराचेच वर्चस्व राहिलेले आहे. कितीही मोठ्या बहुमताने निवडून आलेला पंतप्रधान कसा घालवायचा याचे कसब फक्त तेथील लष्कराकडेच आहे. बाजवांनी तर आपल्या कार्यकाळात दोन पंतप्रधानांची विकेट घेतली. 3 / 10 पाकिस्तानात सर्वात मोठे पावर हाऊस हे इस्लामाबाद, कराचीमध्ये नाही तर रावळपिंडीमध्ये आहे. तिथेच पाकिस्तानी लष्कराचा प्रमुख बसतो आणि सारी सुत्रे हलवितो. बाजवा आता निवृत्त होणार आहेत. परंतू जाता जाता पुन्हा काही काड्या करतील याचा नेम नव्या शरीफांनाही नाही. कारणही तसेच आहे... 4 / 10 बाजवा हे २९ नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. यामुळे आता त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल यावर चर्चा सुरु झाल्या आहेत. हा अधिकारी आपल्या मर्जीतील नसेल तर बाजवा शरीफांचाही काटा काढू शकतात, असे राजकीय धुरिणांना वाटत आहे. पहिल्या शरीफांचा काटा बाजवांनीच काढला होता. 5 / 10 फार वर्षांपूर्वीची गोष्ट नाहीय. २०१६ मध्ये पंतप्रधान होताच नवाझ शरीफ यांनी बाजवांची लष्कर प्रमुख पदी नियुक्ती केली होती. सुरुवातीला सारे काही व्यवस्थित सुरु होते. परंतू बाजवा अस्तनीतला साप निघाले. महत्वाकांक्षांवरून दोघांमध्ये बिनसले आणि शरीफ यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अयोग्य घोषित करण्यात आले. 6 / 10 २०१८ ला निवडणूक लागली, बाजवांनी इम्रान खान यांना उघड पाठिंबा दिला. लष्करच मदतीला लागले. इम्रान खान पंतप्रधानही झाले आणि तीन वर्षांतच पायउतारही. हे सारे कोणी केले, बाजवांनी. यामागचे मुख्य कारण असे होते की इम्रान खान यांना बाजवांच्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्याला आणायचे होते. 7 / 10 अखेरच्या अंधाऱ्या रात्रीपर्यंत इम्रान खान यांनी यासाठी प्रयत्न केले. संरक्षण मंत्रालयातून या अधिकाऱ्यांचे आदेशही निघणार होते. परंतू त्या आधीच लीक झाले आणि बाजवांचे सशस्त्र हेलिकॉप्टर इम्रान खान यांच्या घरासमोर उतरले. बाजवांना मुदतवाढ देण्यास इम्रान खान तयार नव्हते, यामुळे हे सारे घडले आहे. 8 / 10 आताही बाजवांच्या एका मोठ्या अधिकाऱ्याने बाजवांना पुन्हा सेवा विस्तार नकोय, असे सांगितले आहे. यामुळे बाजवा निवृत्त होतील असे म्हटले जात आहे. परंतू, त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल यावर सारे काही अवलंबून आहे. 9 / 10 पाकिस्तानकडे योग्य उमेदवार नाहीत. कारण नोव्हेंबरपर्यंत बाजवांबरोबरच सात लेफ्टनंट जनरलांसह २० जनरल निवृत्त होत आहेत. यामुळे पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख पद सांभाळण्याची कुवत असलेले खूप कमी म्हणजेच चार अधिकारी उरणार आहेत. 10 / 10 साहिर शमशाद मिर्जा, अजहर अब्बास, नौमान महमूद राजा आणि फैज हमीद यांची नावे आघाडीवर आहेत. ते सध्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. पैकी अब्बास हे भारताच्या सीमेवर तैनात आहेत. त्यांच्या नेतृत्वात एलओसीवर कारवाया होत असतात. यामुळे भारतविरोधी म्हणून अब्बास यांची नियुक्ती होण्याची शक्यता जास्त आहे. आणखी वाचा