शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

उत्तर कोरियाने संविधानात बदल केले, दक्षिण कोरियाचे टेन्शन वाढले; वाचा नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 12:39 PM

1 / 7
उत्तर कोरियाने आपल्या घटनेत दुरुस्ती करून दक्षिण कोरियाला पहिल्यांदाच 'शत्रू राष्ट्र' घोषित केले आहे. संविधान बदलण्यासाठी उत्तर कोरियाच्या संसदेची गेल्या आठवड्यात दोन दिवस बैठक झाली.
2 / 7
उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी जानेवारीत दक्षिण कोरियाला देशाचा प्रमुख शत्रू घोषित करण्याचे आवाहन केले होते.
3 / 7
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोरियाने आता वापरात नसलेले आणि एकेकाळी उत्तर कोरियाला दक्षिण कोरियाशी जोडलेले रस्ते आणि रेल्वे मार्ग उद्ध्वस्त केले.
4 / 7
दोन्ही देशांना जोडणारा रस्ता दुवा तोडणे हे स्पष्टपणे दक्षिण कोरियाला शत्रू राष्ट्र म्हणून परिभाषित करते.
5 / 7
दक्षिण कोरियाच्या लष्कराने मंगळवारी उत्तर कोरियाच्या सैनिकांनी दोन्ही देशांना जोडणाऱ्या रस्ते आणि रेल्वे मार्गांवर स्फोटकांचा स्फोट करतानाचे व्हिडीओ फुटेज जारी केले.
6 / 7
किम जोंग उन यांनी या वर्षी जानेवारीमध्ये दिलेल्या भाषणात त्यांनी घटनात्मक बदलांची मागणी केली होती.
7 / 7
किम जोंग उन म्हणाले होते की, जर दक्षिण कोरियाने आमच्या जमीन, आणि पाण्याच्या ०.००१ मिमी क्षेत्रावरही अतिक्रमण केले तर युद्ध होईल.
टॅग्स :north koreaउत्तर कोरिया