शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Nostradamus Predictions 2021: दुष्काळ, भूकंपाने हाहाकार माजणार; 2021 संदर्भात अशी आहे नॉस्ट्रॅडेमसची भविष्यवाणी

By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 07, 2020 8:51 PM

1 / 10
फ्रान्समध्ये जन्मलेल्या मायकल दि नॉस्ट्रॅडेमसने 'ले प्रोफेटिस' या पुस्तकात जगाबाबत विविध प्रकारची भाकिते केली आहेत. या पुस्तकाची पहिली आवृत्ती 1555मध्ये प्रसिद्ध झाली. या पुस्तकात एकूण 6338 भविष्यवाणी आहेत ज्यापैकी साधारण 70 टक्के भविष्यवाणी या खऱ्या ठरल्या आहेत. त्याची भविष्यवाणी ही क्वाट्रेन या छंदात आहेत.
2 / 10
2020ची भविष्यवाणी खरी ठरली - 2020मध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरस महामारीलादेखील नॉस्ट्रॅडेमसच्या भविष्यवाणीशी जोडून पाहिले जात आहे. तसेच इतर ऐतिहासिक घटनांकडेही त्यांच्या भविष्यवाणीशी जोडून पाहिले जाते. जाणून घेऊया 2021साठीच्या नॉस्ट्रॅडेमसच्या भविष्यवाणी.
3 / 10
झॉम्बी- २०२१च्या आसपास रशियन वैज्ञानिक एक असे जैविक अस्त्र आणि विषाणू तयार करतील जे कोणत्याही व्यक्तीचे रुपांतर एका झॉम्बीत करतील आणि हे मानवी संस्कृतीच्या मोठ्या नुकसानीचे कारण ठरेल.
4 / 10
दुष्काळ - नॉस्ट्रॅडेमसने म्हटले होते, की दुष्काळ, भूकंप, विविध प्रकारचे आजार आणि महामारी जगाच्या अंताचे पहिले संकेत असील. जे सध्या सुरू आहे.
5 / 10
वर्ष 2020ची कोरोना महामारी याची सुरुवात मानली जात आहे. जिच्यापुढे संपूर्ण जग हतबल झाले आहे. यामुळे जगाचे मोठे नुकसान झाले आहे.
6 / 10
सूर्यावर होणार महास्फोट - नॉस्ट्रॅडेमसने म्हटले आहे की २०२१च्या आसपास सूर्यावर प्रचंड स्फोट होईल आणि त्याच्या परिणामापासून पृथ्वीही वाचणार नाही. समुद्राची पातळी वाढल्याने पृथ्वीचा मोठा भाग पाण्याखाली जाईल.
7 / 10
हवामान बदलामुळेमुळे युद्ध आणि संघर्षाची स्थिती निर्माण होईल. नैसर्गिक स्रोतांसाठी जगात विवाद निर्माण होतील आणि लोक एका जागेतून दुसऱ्या ठिकाणी पलायन करतील.
8 / 10
धुमकेतू पृथ्वीवर आदळणार - नॉस्ट्रॅडेमसने एका 'क्वाट्रेन'मध्ये धुमकेतू पृथ्वीवर आदळण्यासंदर्भातही भाष्य केले आहे. यामुळे भूकंप तथा अनेक संकटेही येऊ शकतात.
9 / 10
NASAतील वैज्ञानिकांनी आधीच एक मोठा धूमकेतू पृथ्वीवर आदळू शकतो, अशी शक्यता वर्तवली आहे. यावेळी हे अत्यंत गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. कारण 2009 KF1 नावाच्या एका अॅस्टेरॉईड 6 मे 2021 रोजी पृथ्वीला धडकण्याची शक्यता आहे.
10 / 10
वैज्ञानिकांनी म्हटले आहे, की या अॅस्टेरॉईडची शक्ती 1945मध्ये हिरोशिमवर अमेरिकेने टाकलेल्या अनू बॉम्बपेक्षा 15 पट अधिक असेल.
टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयcorona virusकोरोना वायरस बातम्याEarthquakeभूकंपwarयुद्ध