शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Baba Vanga पेक्षाही खतरनाक आहे Nostradamusची 2023 संदर्भातील भविष्यवाणी, संपूर्ण जग दहशतीखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2022 2:56 PM

1 / 7
संपूर्ण जगात बाबा वेंगा (Baba Vanga) आणि नॉस्ट्रॅडॅमस (Nostradamus) यांच्या भाकितांची सर्वाधिक चर्चा होत असते. मुळ फ्रान्सच्या असलेल्या नॉस्ट्रॅडॅमस यांची भाकितं (Nostradamus Predictions) सत्य सिद्ध झाली आहेत. 1566 साली नॉस्ट्रॅडॅमस यांचा मृत्यू झाला. यापूर्वी नॉस्ट्रॅडॅमस यांनी तब्बल 6338 भाकितं लिहून ठेवली आहेत.
2 / 7
नॉस्ट्रॅडॅमस यांनी लिहून ठेवलेल्या या भाकितांमध्ये दरवर्षी घडणाऱ्या मोठ्या घटनांसंदर्भात भाष्य केले आहे. एवढेच नाही, तर त्यांनी याशिवाय जग नष्ट होण्यासारखी भयभीत करणारी भाकितंही वर्तवली आहेत. नॉस्ट्रॅडॅमस यांनी दर वर्षासाठी वेग वेगळी भाकितं केली आहेत. त्यांनी 2023 साठीही काही धक्कादायक भाकितं केली आहेत.
3 / 7
नॉस्ट्रॅडॅमस यांचा जन्म 14 डिसेम्बर 1503 रोजी जर्मनी येथे झाला होता आणि त्यांचा मृत्यू 2 जुलै 1566 रोजी झाला. नॉस्ट्रॅडॅमस यांनी दुसरे महायुद्ध, 9/11चा दहशतवादी हल्ला आणि फ्रान्स क्रांतीसंदर्भआतही भविष्यवाणी केली होती. त्यांची ही भाकितं खरी ठरली आहेत.
4 / 7
नॉस्ट्रॅडॅमस यांनी केली आहे तिसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी - नॉस्ट्रॅडॅमस यांनी केलेल्या भविष्यवाणीनुसार, 2023 मध्ये तिसरे महायुद्ध सुरू होऊ शकते. नॉस्ट्रॅडॅमस यांनी आपल्या भविष्यवाणीत 2023 मध्ये महा युद्ध होण्याचा उल्लेख केला आहे. 'सात महिने महायुद्ध, वाईट कामांमुळे लोकांचा मृत्यू,' असे त्यांनी लिहून ठेवले आहे.
5 / 7
नॉस्ट्रॅडॅमस यांच्या या भविष्यवाणीचा संदर्भ लोक तिसऱ्या महायुद्धाशी जोडत आहेत. रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेले युद्धाचे रुपांतर 2023 पर्यंत तिसऱ्या महायुद्धात होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.
6 / 7
आकाशातून आग कोसळण्यासंदर्भात भविष्यवाणी - नॉस्ट्रॅडॅमस यांनी आपल्या भविष्यवाणीत (Nostradamus Pridiction) 2023 मध्ये कुण्या शहरी महालावर आकाशातून आग कोसळण्यासंदर्भात भाष्य केले आहे. काही लोकांचे म्हणणे आहे, की सभ्यतेच्या राखेतून एका नव्या जगाचा उदय होईल. तसेच काही लोक याकडे एखादा मोठा राजा अथवा राष्ट्रपतीवर येणारे संभाव्य मोठा धोका म्हणून पाहत आहेत.
7 / 7
मंगळ ग्रहावर पोहोचू शकतो माणूस - नॉस्ट्रॅडॅमसने (Nostradamus) आपल्या भाकितांमध्ये माणून मंगळ ग्रहावर पोहोचण्यासंदर्भात भाष्य केले होते. एवढेच नाही, तर माणवाला 2023 मध्ये मंगळ ग्रहावर पोहोचण्यासंदर्भातील मिशनमध्ये मोठे यश मिळू शकते, असेही म्हटले होते.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषwarयुद्धRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया