शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2024 9:36 PM

1 / 10
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इस्रायल इराणच्या आण्विक ठिकाणांना लक्ष्य करू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, अमेरिका कोणत्याही परिस्थितीत इराणच्या अण्विक ठिकाणांवर केलेल्या हल्ल्याला पाठिंबा देणार नाही, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी स्पष्ट केले आहे.
2 / 10
दरम्यान, G-7 देशांनीही तातडीची बैठक घेऊन इराण आणि इस्रायलदरम्यान खुल्या झालेल्या युद्ध आघाडीवर चिंता व्यक्त केली आहे. तसेच युद्ध आणखी भडकू नये यासाठी चर्चा केली.
3 / 10
खरे तर, इस्रायल सध्या केवळ हमास, हिजबुल्ला आणि इराण यांच्यासोबत युद्धच लढत नाही, तर एकूण सात आघाड्यांवर शत्रूंचा सामना करत आहे. हे युद्ध गेल्या वर्षी हमासच्या हल्ल्यांपासून सुरू झाले आहे. ज्यात 1200 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला होता. यानंतर इस्रायलने गाझामध्ये हमासविरुद्ध युद्ध सुरू केले.
4 / 10
दरम्यान, लेबनीज दहशतवादी संघटना हिजबुल्लाहचे दहशतवादी सातत्याने इस्रायलवर हल्ले करत होते. यामुळे आता इस्रायलने गेल्या दोन आठवड्यांपासून हिजबुल्लाला आपले लक्ष्य बनवले आहे. त्याच्या प्रमुखासह अनेक कमांडर मारले गेले आहेत. इस्रायलने आता लेबनॉनमध्ये जमिनीवरील कारवाईलाही सुरू केली असून, इस्त्रायली सैन्य सीमेपासून सुमारे 40 किलोमीटरपर्यंत आत लेबनॉनमध्ये शिरले आहे.
5 / 10
हिजबुल्लाशिवाय येमेनचे हुती बंडखोरही इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले करत आहे. इस्त्रायली सैन्यही त्यांना चोख प्रत्युत्तर देत आहे. इराण या दोन्ही दहशतवादी संघटनांना पैसा, शस्त्रे आणि प्रशिक्षण देतो आणि त्यांच्या माध्यमाने मध्यपूर्वेत प्रॉक्सी वॉर तरतो.
6 / 10
इराणने मंगळवारी इस्रायलवर सुमारे 200 क्षेपणास्त्रे डागली, त्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी परिणामांना सामोरे जाण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे इराणनेही इस्रायलने प्रत्युत्तर दिल्यास त्याचे परिणाम वाईट होतील, असे म्हटले आहे.
7 / 10
याशिवाय इस्रायल इतर आघाड्यांवरही युद्ध लढत आहे. यात सीरिया, इराक आणि वेस्ट बँकचाही समावेश आहे. सीरिया आणि इराकमधील कट्टरपंथी दहशतवादीही इस्रायलला लक्ष्य करत आहेत.
8 / 10
तर वेस्ट बँकेच्या पॅलेस्टाईन इस्लामिक जिहाद (पीआयजे) नावाच्या संघटनेनेही इस्रायलविरोधात आघाडी उघडली आहे. हा एक सुन्नी इस्लामिक दहशतवादी गट आहे जो इस्लामिक पॅलेस्टिनी राज्य स्थापन करू इच्छितो आणि इस्रायलचा सर्वनाश करू इच्छितो.
9 / 10
पीआयजे हा गाझा पट्टी आणि वेस्ट बँकमधील दुसरा सर्वात मोठा दहशतवादी गट आहे. एकंदरीत, ज्यू देश इस्रायल सध्या सात आघाड्यांवर सात शत्रूंशी लढत आहे आणि हे सर्व शत्रू इस्लामिक आहेत.
10 / 10
पीआयजे हा गाझा पट्टी आणि वेस्ट बँकमधील दुसरा सर्वात मोठा दहशतवादी गट आहे. एकंदरीत, ज्यू देश इस्रायल सध्या सात आघाड्यांवर सात शत्रूंशी लढत आहे आणि हे सर्व शत्रू इस्लामिक आहेत.
टॅग्स :Israelइस्रायलIsrael-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षIranइराणTerrorismदहशतवाद