Now in the five star hotels in Iraq, the five-star hotel
इराकमध्ये आता मांजरांसाठी पंचतारांकित हॉटेल By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2018 8:09 PM1 / 5इराकमधल्या बसरा शहरात देशातीत सर्वात पहिलं मांजरांसाठीचं हॉटेल उघडलं आहे. 22 वर्षांच्या अहमद ताहेर मकी या पशुवैद्यकीय विद्यार्थ्यानं हे हॉटेल मांजरांसाठी बनवलं आहे.2 / 5या हॉटेलच्या माध्यमातून बसरा शहरात मांजरांना दत्तक घेणा-यांसाठी प्रोत्साहित करण्याचा त्याचा मानस आहे. 3 / 5तसेच या हॉटेलमध्ये आजारी असलेल्या मांजरांसाठीही एक वेगळ्या खोलीची व्यवस्था करण्यात आली आहे. 4 / 5विशेष म्हणजे या सर्व लक्झरी सुविधा फारच कमी मूल्यात उपलब्ध आहेत. दोन खोलांच्या या हॉटेलमध्ये बेड, वेगवेगळ्या प्रकारचं निरोगी अन्न, छोटंसं खेळाचं मैदान आणि वातानुकूलित यंत्रणेची सुविधा आहे. 5 / 5एका वेळी या हॉटेलमध्ये 30 मांजरी राहू शकतात. या हॉटेलमध्ये एक रात्र घालवण्याची किंमत 5 हजारांपासून 7 हजारांपर्यंत इराकी चलन आहे आणखी वाचा Subscribe to Notifications