शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus News: चिंतेत भर! कोरोनाची लस घेतल्यानंतर सहा दिवसांत नर्सला कोरोनाची लागण

By कुणाल गवाणकर | Published: December 30, 2020 12:59 PM

1 / 10
जगातील कोरोनाचा कहर सुरूच आहे. जगभरातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा ८ कोटींच्या पुढे गेला आहे. तर मृतांची संख्या १८ लाखांच्या जवळपास पोहोचला आहे.
2 / 10
अमेरिकेतील कोरोना रुग्णांचा आकडा २ कोटींच्या जवळ गेला आहे. कोरोनानं आतापर्यंत जवळपास साडे तीन लाख अमेरिकन नागरिकांचा बळी घेतला आहे.
3 / 10
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमेरिकेनं लसींच्या आपत्कालीन वापरास परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून वेगानं लसीकरण सुरू आहे.
4 / 10
एकीकडे लसीकरणानं वेग घेतला असताना अमेरिकेच्या सॅन डियागोमध्ये एक वेगळीच घटना समोर आली आहे. कोरोनावरील लस घेतलेली नर्स सहा दिवसांनंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे.
5 / 10
एबीसी न्यूजच्या वृत्तानुसार, सॅन डियागोमध्ये नर्स म्हणून काम करणाऱ्या ४५ वर्षीय मॅथ्यू डब्ल्यू. यांना १८ डिसेंबरला फायझरची कोरोनावरील लस देण्यात आली.
6 / 10
कोरोनाची लस टोचण्यात आल्यानंतर मॅथ्यू यांना साईड इफेक्ट जाणवू लागले. त्यांच्या हाताला वेदना होऊ लागल्या. सहा दिवसांनंतर लक्षणं जाणवू लागल्यानं त्यांनी कोरोना चाचणी केली. तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
7 / 10
कोरोनावरील लस दिल्यानंतर पुढील काही दिवसांत कोरोनाची लागण होण्याची घटना धक्कादायक किंवा आश्चर्यजनक नसल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं.
8 / 10
कोरोनावरील लस घेतल्यानंतर १० ते १४ दिवसांनंतरच व्यक्तीच्या शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होत असल्याची माहिती संसर्गजन्य रोगाचे तज्ज्ञ असलेल्या क्रिस्टियन रॅमर्स यांनी दिली.
9 / 10
लस टोचण्यात आल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती तयार करण्यासाठी दीड ते दोन आठवड्यांचा कालावधी लागतो. त्यानंतर कोरोना लसीचा दुसरा डोजदेखील घ्यावा लागतो, असं क्रिस्टियन रॅमर्स यांनी सांगितलं.
10 / 10
संबंधित नर्स कोरोनाची लस देण्यापूर्वीच कोरोना पॉझिटिव्ह असावी. मात्र तिच्या शरीरात कोरोनाची कोणतीही लक्षणं नसावीत, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाची लक्षणं दिसण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी लागतो.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या