बाबो! तब्बल दोन महिन्यांनी दुकाने, सिनेमा गृहे उघडली; अवस्था पाहून शॉक बसेल By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 7:34 PM
1 / 14 भारतात येत्या काही दिवसांत लॉकडाऊन ४.० सुरु होईल. सध्या काही दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली असली तरीही मोठमोठे किंवा छोटे शोरुम उघडण्यास परवानगी मिळालेली नाही. पण मलेशियामध्ये ही परवानगी मिळाली आहे. 2 / 14 तेथील दुकानदार आणि थिएटर मालकाने तब्बल दोन महिन्यांनी कुलुप उघडले. मात्र, आतील दृष्ये पाहून त्यांची झोपच उडाली. 3 / 14 मलेशियातील एका लेदर उत्पादने विकणाऱ्या दुकानदाराने त्याचा शोरुम उघडला. आतमध्ये पाहतो तर सर्व शूज, बेल्ट, बॅग असा सर्व माल खराब झाला होता. 4 / 14 या लेदरच्या मालावर बुरशी चढली होती. यामुळे ही आकर्षक पर्स, पाकिटे एकदम टाकून देण्यासारखी वाटत होती. 5 / 14 पुढे सिनेमागृहाची हालत बघा... 6 / 14 भारतातही हीच हालत होणार आहे. 7 / 14 कपड्यांचे शोरुम, मॉल्स मधील लाखो रुपये किंमतीच्या वस्तू काही शे किंवा हजारात मिळण्याची शक्यता आहे. 8 / 14 कारण एकतर या वस्तू टाकून देण्याच्या लायकीच्या असतील किंवा रस्त्याकडेला विकाव्या लागतील. 9 / 14 दुसरीकडे एका सिनेमा गृहाच्या मालकाने थिएटरचे टाळे उघडले. आतमध्ये जाऊन पाहतो तर त्याचे नाक कुबट वासाने बंद करावे लागले. 10 / 14 सिनेमागृहाचे मॅट आणि सीट सगळीकडे बुरशी लागली होती. 11 / 14 या दोन्ही दालनांची साफसफाई करण्यासाठी आणखी काही आठवडे लागण्याची शक्यता आहे. 12 / 14 लेदर शॉपवाल्याला आतील सर्व माल एकतर पॉलिश करून घ्यावा लागेल आणि डिस्काऊंटमध्ये विकावा लागेल, किंवा तो माल फेकून देऊन नवीन माल भरावा लागणार आहे. नवीन मालही मिळणे काहीसे कठीणच दिसत आहे. कारण फॅक्टरीही बंदच होत्या. तेथील परिस्थितीही फारशी वेगळी नसणार आहे. 13 / 14 लेदर शॉपवाल्याला आतील सर्व माल एकतर पॉलिश करून घ्यावा लागेल आणि डिस्काऊंटमध्ये विकावा लागेल, किंवा तो माल फेकून देऊन नवीन माल भरावा लागणार आहे. नवीन मालही मिळणे काहीसे कठीणच दिसत आहे. कारण फॅक्टरीही बंदच होत्या. तेथील परिस्थितीही फारशी वेगळी नसणार आहे. 14 / 14 तर थिएटरवाल्याला त्याच्या सीटच्या कुशन आणि मॅट एकतर खोलून धुवून घ्यावे लागेल किंवा पूर्ण बदलावे लागणार आहे. कारण एसी असल्याने दर्शक त्या ठिकाणी बसणे कठीण आहे. शिवाय बुरशीची अॅलर्जी होईल ही समस्या वेगळीच असणार आहे. आणखी वाचा