शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बाबो...जगातील पहिले सोन्याचे हॉटेल; एका रात्रीचे भाडे केवळ 20 हजार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 1:37 PM

1 / 13
जगातील पहिले सोन्याचे हॉटेल व्हिएतनामची राजधानी हनोईमध्ये खुले झाले आहे. येथे दरवाजे, कप, टेबल, खिडक्या, नळ, वॉशरुम, भांडी आदी सारेच सोन्याचे आहे. 2 जुलै म्हणजेच गुरुवारी या हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले.
2 / 13
या हॉटेलचे नाव डोल्से हनोई गोल्डन लेक (Dolce Hanoi Golden Lake) असे आहे. या हॉटेलचे गेट ते कॉफीच्या कपापर्यंत साऱ्या वस्तू सोन्याच्या बनविण्यात आल्या आहेत.
3 / 13
हे एक पंचतारांकित हॉटेल असून 25 मजल्याचे आहे. या हॉटेलमध्ये 400 खोल्या आहेत. हॉटेलच्या बाहेरील भिंतींवर जवळपास 54 हजार वर्ग फुटांच्या गोल्ड प्लेटेड टाईल्स लावण्यात आल्या आहेत.
4 / 13
हॉटेलच्या स्टाफचा ड्रेसकोड हा लाल आणि गोल्डन रंगाचा ठेवण्यात आला आहे. लॉबीमध्ये फर्निचर आणि सज्जाही सोन्याच्या कलाकृतीमध्ये केलेला आहे. कारण सारे हॉटेल गोल्डन असल्याचे दिसेल.
5 / 13
वॉशरुममधील बाथटब, सिंक, शॉवरसह सारे सोन्याचे आहे. बेडरुममधील फर्निचरलाही सोन्याचा पत्रा वापरलेला आहे.
6 / 13
हॉटेलच्या छतावरही इन्फिनिटी पूल बनविण्यात आले आहे. येथे हनोई शहराचे सुंदर दृष्य दिसते. छपराच्या भिंतीवरही सोन्याचा मुलामा असलेल्या विटा वापरण्यात आल्या आहेत.
7 / 13
पहिल्याच दिवशी ग्राहकांनी या हॉटेलमध्ये राहण्यासाठी गर्दी केली होती. या हॉटेलच्या भिंती आणि शॉवरही गोल्ड प्लेटेड आहेत. या ठिकाणी लोक त्यांचे फोटो काढताना दिसून आले.
8 / 13
या हॉटेलच्या निर्मितीला 2009 मध्ये सुरु झाले होते. हॉटेलच्या वरच्या फ्लोअरवर फ्लॅटही बनविण्यात आले आहेत. जर कोणाला फ्लॅट विकत घ्यायचा असेल तर तो घेऊ शकतो.
9 / 13
या हॉटेलला दक्षिण-पूर्व आशियातील सर्वात लक्झरी हॉटेलचा मान देण्यात आला आहे. हे हॉटेल होआ बिन ग्रुप आणि विनधम ग्रुपने मिळून बनविले आहे. हे ग्रुप आणखी 2 सुपर 6 स्टार हॉटेल चालवितात.
10 / 13
सोने हे मानसिक तणावाला कमी करण्याचे काम करते. यामुळे हॉटेल प्रशासनाने जास्तीतजास्त सोन्याचा वापर केला आहे.
11 / 13
डबल बेडरुम सूटचे एका रात्रीचे भाडे 75 हजार रुपये असून हॉटेल रुम्सचे भाडे 20000 रुपयांपासून सुरु होते.
12 / 13
या हॉटेलमध्ये 6 प्रकारचे रुम आहेत. तसेच ६ प्रकारचे सूटही आहेत. प्रेसिंडेंशिअल सूटसाठी 4.85 लाख रुपये एवढे भाडे आकारले जाते.
13 / 13
या हॉटेलमध्ये गेमिंग क्लबही आहे जो 24 तास सुरु असणार आहे. येथे कसिनो आणि पोकरसारखे गेमही आहेत. जिंकल्यानंतर पैसेही वसूल होऊ शकतात.
टॅग्स :Goldसोनंhotelहॉटेल