omicron ba 4 ba 5 variants corona monkeypox hepatitis tomato mars norovirus kerala flue around world
टेन्शन वाढलं! कोरोना, मंकीपॉक्स, टोमॅटो फ्लू ते नोरोव्हायरस; जगभरात 'या' व्हायरसचा धुमाकूळ By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2022 4:46 PM1 / 16कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 53 कोटींचा टप्पा पार केला असून एकूण रुग्णांची संख्या 538,235,797 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे 6,326,974 लोकांना जीव गमवावा लागला आहे. 2 / 16प्रगत देशही कोरोनापुढे हतबल झाले असून अनेक ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. याच दरम्यान ओमायक्रॉनने देखील चिंता वाढवली आहे. 3 / 16कोरोनाच्या तुलनेत ओमायक्रॉन अत्यंत वेगाने पसरत असल्याने रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. वेगाने पसरणाऱ्या व्हेरिएंटमुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत.4 / 16जग कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच आता नवनवीन व्हायरस हे सातत्याने समोर येत आहे. तज्ज्ञांनी याआधीच कोरोना महामारी संपलेली नसून यानंतरही अनेक व्हायरसचा सामना करावा लागेल असं म्हटलं आहे. 5 / 16कोरोना, ओमायक्रॉन, मंकीपॉक्स, टोमॅटो फ्लू ते नोरोव्हायरसपर्यत अनेक व्हायरस सध्या पाहायला मिळत आहे. जगभरात त्यांनी धुमाकूळ घातला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोना व्यतिरिक्त इतर आजाराचा प्रसार होत असल्याचं म्हटलं आहे. 6 / 1633 देशांमध्ये एक्यूट हेपेटायटिसची शेकडो प्रकरणं समोर येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून जगभरातील मुलांमध्ये अनएक्सप्लेंड एक्यूट हेपेटायटीसची प्रकरणे दिसून येत आहेत. अशा प्रकरणांची संख्या अचानक का वाढू लागली हे संशोधकांना समजू लागले आहे.7 / 16जागतिक आरोग्य संघटना (WHO), यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) आणि यूके हेल्थ सिक्युरिटी एजन्सीसह प्रमुख आरोग्य अधिकार्यांनी या आजाराबाबत इशारा जारी केला आहे, कारण जगभरातील देशांमध्ये प्रकरणे वाढत आहेत.8 / 16मंकीपॉक्सच्या वाढत्या प्रकरणांमुळे WHO ची चिंता वाढली आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस अधानोम यांनी बाधित देशांना सर्व्हिलान्स वाढवण्याचे आवाहन केले आहे. जगभरातील 27 देशांमध्ये 1000 हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. 9 / 16सर्वात मोठा दिलासा म्हणजे मंकीपॉक्स विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण साधारणपणे खूप कमी आहे आणि आतापर्यंत कोणत्याही देशात या आजाराने मृत्यूची नोंद झालेली नाही. पण लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.10 / 16मंकीपॉक्सची लागण झालेल्या रुग्णाला सर्वप्रथम ताप येतो. यानंतर, त्याच्या शरीरावर चेचक पुरळ उठतात. लिम्फ नोडमध्ये सूज देखील असू शकते. विशेष म्हणजे मंकीपॉक्स हा कांजण्या, गोवर, खरुज यांसारख्या आजारांपेक्षा वेगळा आहे.11 / 16टोमॅटो फ्लू हे व्हायरल इन्फेक्शन आहे. हा व्हायरस प्रामुख्याने 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना प्रभावित करतो. याच्या संसर्गामुळे होणाऱ्या आजाराला टोमॅटो फ्लू असे नाव देण्यात आले आहे.12 / 16जेव्हा त्याचा संसर्ग लहान मुलांना होतो तेव्हा संसर्ग झालेल्या मुलांच्या शरीरावर टोमॅटोसारखे लाल रंगाचे पुरळ उठतात. या दाण्यांमध्ये खाज सुटते, ज्यामुळे खरचटून त्यांची जळजळ होते. बाधित बालकालाही खूप ताप येतो.13 / 16टोमॅटो फ्लूची लागण झालेल्या मुलांच्या शरीरात आणि सांधेदुखीचीही तक्रार आहे. हा विषाणू त्याच्या संसर्गाने मुलांची पचनशक्ती बिघडवतो, त्यामुळे मुले डिहायड्रेशनची शिकार होत असल्याचं समोर आलं आहे.14 / 1611 मे रोजी जर्मनीमध्ये स्वाइन फ्लू चा एक रुग्ण समोर आला होता. त्यानंतर रुग्ण आढळले नाहीत पण काही दिवसांपूर्वी भारतातील केरळच्या कोझिकोडमध्ये 12 वर्षीय मुलीला स्वाइन फ्लूमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. 15 / 16केरळमधील दोन लहान मुलांमध्ये नोरोव्हायरस आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नोरोव्हायरस हा एक अत्यंत संसर्गजन्य रोग आहे, जो सामान्यतः दूषित पाणी, दूषित अन्न आणि संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून पसरतो.16 / 16सुरुवातीची लक्षणे म्हणजे उलट्या आणि जुलाब, जे व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर एक किंवा दोन दिवसांनी सुरू होतात. रुग्णाला उलट्या झाल्यासारखे वाटते आणि ओटीपोटात दुखणे, ताप, डोकेदुखी आणि शरीर दुखणे जाणवते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications