By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2021 18:54 IST
1 / 15जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे, रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता वाढवली आहे. अनेक देशांमध्ये कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाले असून प्रगत देशही व्हायरसपुढे हतबल झाल्याचं पाहायला मिळत आहे. 2 / 15ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्या चिंता वाढवणारी आणखीन एक घटना समोर आली आहे. हवेतून ओमायक्रॉन व्हेरिएंट पसरत असल्याचा धक्कादायक खुलासा रिपोर्टमधून करण्यात आला आहे.3 / 15हाँगकाँगमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईनमध्ये असूनही दोन रुग्णांमध्ये ओमायक्रॉनचा (Omicron) संसर्ग पसरला आहे. हॉटेलमध्ये समोरा-समोर खोलीत राहणाऱ्या दोन प्रवाशांना ओमायक्रॉनची लागण झाली आहे. 4 / 15चिंतेची बाब म्हणजे दोन्ही प्रवाशांना कोरोना लसीचे सर्व डोस मिळाले होते. ओमायक्रॉनचा संसर्ग हवेतूनही पसरत असल्याचा यावरून दावा केला जात आहे. त्यामुळेच हाय म्युटेशन असलेल्या या व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे, 5 / 15जर्नल इमर्जिंग इन्फेक्शियस डिसीजमध्ये याबद्दल माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. या दोन रुग्णांवर केलेल्या स्टडीनुसार, 13 नोव्हेंबरला एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला, त्याला कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.6 / 15रुग्णाला नंतर हॉटेलमध्ये वेगळे ठेवले गेले, तर दुसऱ्या रुग्णामध्ये 17 नोव्हेंबर रोजी सौम्य लक्षणे दिसली आणि तो SARS-CoV-2 पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. इमर्जिंग इन्फेक्शियस डिसीज या जर्नलमध्ये शुक्रवारी प्रकाशित झालेल्या अभ्यासात, हाँगकाँग विद्यापीठातील संशोधकांनी माहिती दिली. 7 / 15सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजमध्ये असे दिसून आले आहे की, दोन्ही रुग्णांनी त्यांची खोली सोडलेली नाही किंवा त्यांचा एकमेकांशी संपर्कही झालेला नाही. फक्त अन्न पदार्थ घेण्यासाठी किंवा कोरोना चाचणीसाठी दरवाजे उघडले गेले होते. त्यामुळे हा संसर्ग हवेतून पसरत असल्याचे अभ्यासातून दिसून येत आहे. 8 / 15अभ्यासात असे म्हटले आहे की, दरवाजा उघडल्यानंतर ओमायक्रॉनचा विषाणू हवेतून एका खोलीतून दुसऱ्या खोलीमध्ये गेला असावा. कॉरिडॉरमध्ये हवेतून प्रसारित झाल्यामुळे विषाणूचा प्रसार झाला असावा असे सांगण्यात येत आहे.9 / 15ओमिक्रॉन प्रकार प्रथम 11 नोव्हेंबर रोजी बोत्सवानामध्ये आणि तीन दिवसांनी दक्षिण आफ्रिकेत ओळखला गेला. त्यानंतर संपूर्ण जगात खळबळ उडाली आणि त्यानंतर अनेक देशात रुग्ण सापडले आहेत. 10 / 15भारतासह जगातील अनेक देशांमध्ये त्याचा प्रसार झाला आहे. आतापर्यंत भारतात या प्रकाराचे जवळपास 21 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 11 / 15जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याला व्हेरिएंट ऑफ कन्सर्न अर्थात चिंतेचा व्हेरिएंट असल्याचं म्हटलं आहे. या व्हेरिएंटमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रविवारी जागतिक आरोग्य संघटनेने या व्हेरिएंटबद्दलची काही नवी माहिती नागरिकांना दिली.12 / 15Omicron ची डिजीटल इमेज जारी करण्यात आली आहे. वैज्ञानिकांनुसार, Omicron च्या वरच्या भागात प्रोटीन असतं जे मानवी कोशिकांसोबत संपर्क करतं. याचा अर्थ असा अजिबात नाही की, Omicron जुन्या व्हेरिएंटच्या तुलनेत जास्त म्यूटेट होतो म्हणजे Omicron डेल्टा व्हेरिएंटपेक्षा जास्त खतरनाक आहे.13 / 15जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या निदानासाठी वापरल्या जाणाऱ्या RT-PCR टेस्टच्या माध्यमातून ओमायक्रॉन व्हेरिएंटचं निदान करणं शक्य आहे.14 / 15ओमायक्रॉन व्हेरिएंटचं म्युटेशन अत्यंत वेगळं असल्याचंही NGS-SA ने स्पष्ट केलं आहे. ओमायक्रॉन हा व्हेरिएंट डेल्टा, अल्फा आदी यापूर्वीच्या व्हेरिएंटच्या तुलनेत जास्त संसर्गजन्य आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.15 / 15ज्या व्यक्तींना कोरोना विषाणूच्या कोणत्याही प्रकारच्या व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे, त्यांना ओमायक्रॉनच्या संसर्गाचा धोका जास्त आहे. तसंच, पूर्वी कोरोना संसर्ग होऊन त्यातून बऱ्या झालेल्या व्यक्तींना ओमायक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग सहजतेने होऊ शकतो, असंही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे.