शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Omicron Variant : बापरे! अमेरिकेत चिमुकल्यांवर ओमायक्रॉन करतोय अटॅक; 5 वर्षांखालील मुलांना सर्वाधिक धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 8:58 AM

1 / 15
जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. प्रगत देशही हतबल झाले आहेत. कोरोनावर विविध ठिकाणी संशोधन सुरू असून संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे. यातच लहान मुलांना कोरोना संसर्ग होण्याचं प्रमाण वाढलं आहे.
2 / 15
भारतात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर दुसरीकडे अमेरिका, ब्रिटनमध्ये ही भीती काही प्रमाणात खरी होताना पाहायला मिळत आहे.
3 / 15
लहान मुलांमधील कोरोना रुग्णांची संख्या ही आधीच्या तुलनेत वाढली असल्याचं समोर आलं आहे. भारतासाठी हा धोक्याचा इशारा असून प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे. ओमायक्रॉनमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
4 / 15
अमेरिकेत चिमुकल्यांवर आता ओमायक्रॉन अटॅक करत असल्याची माहिती समोर आली आहे. 5 वर्षांखालील मुलांना याचा सर्वाधिक धोका असून त्यांच्यावर वाईट परिणाम होत आहे. अमेरिकेत ओमायक्रॉनचे थैमान पाहायला मिळत आहे.
5 / 15
लहान मुलांना या नव्या व्हेरिएंटची मोठ्या प्रमाणात लागण होत आहे. व्हाईट हाऊसकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांमध्ये लहान मुलांचं प्रमाण हे अधिक आहे.
6 / 15
न्यूयॉर्कमध्ये 18 वर्षांहून कमी वय असलेल्या मुलांचं रुग्णालयाय भरती होण्याचं प्रमाण हे चार पटीने वाढलं आहे. अमेरिकेच्या सरकारने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या मुलांपैकी 50 टक्के मुलं ही पाच वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत.
7 / 15
अमेरिकेत लहान मुलांना कोरोना लस देण्यात आलेली नाही. जॉन्स हॉपकिंग युनिव्हर्सिटीच्या डेटानुसार, अमेरिकेत दररोज दोन लाख नवे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. बायडन सरकारने लसीकरणाचा वेग कमी ठेवल्याचं डॉक्टर एंथनी फाऊची यांनी म्हटलं आहे.
8 / 15
फाऊची यांनी अत्यंत सतर्क राहणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनची जास्त लक्षणं दिसून येत नाहीय मात्र तो प्रचंड वेगाने पसरत आहे. त्यामुळे आरोग्य सेवेवर देखील ताण आल्याचं फाऊची यांनी म्हटलं आहे.
9 / 15
ब्रिटन, युरोपमध्ये देखील कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. डेल्टा व्हेरिएंटसोबतच ओमायक्रॉनचा देखील मोठा धोका आहे. ब्रिटनमध्ये दररोज जवळपास एक लाख नवे रुग्ण आढळून येत आहेत.
10 / 15
फ्रान्स, नेदरलँडसारख्ये देशांमध्ये देखील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. इटलीमध्ये डेल्टा व्हेरिएंटने थैमान घातले आहे. अनेक देशांमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहेत तर काही ठिकाणी लॉकडाऊन आहे.
11 / 15
कोरोनाने संपूर्ण जगाचं टेन्शन वाढवलं आहे. कोरोनामुळे काही देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच रुग्णसंख्या वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे रुग्णांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
12 / 15
कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना सुरू असताना जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे. ओमायक्रॉन बहुतेक देशांमध्ये पोहोचला आहे आणि तो अभूतपूर्व वेगाने पसरत आहे असं म्हटलं आहे.
13 / 15
कोरोना लसीकरण पूर्ण झालेल्या लोकांना किंवा यापूर्वी कोरोना होऊन गेलेल्या लोकांनाही ओमायक्रॉनचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याचं आता समोर आलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
14 / 15
डब्ल्यूएओचे महानिर्देशक ट्रेडोस अधनोम घेब्रेसिस यांनी जगातील सध्याच्या कोरोना परिस्थितीसंदर्भात सविस्तर माहिती दिली. आता समोर आलेल्या पुराव्यांनुसार कोरोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टाच्या तुलनेत फारच वेगाने पसरत असल्याचं म्हटलं आहे.
15 / 15
ट्रेडोस यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे सर्व डोस घेतलेल्यांना किंवा यापूर्वी कोरोनावर मात केलेल्यांमध्येही या नवीन विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. WHO ने दिलेल्या माहितीनुसार जगामधील 89 देशांमध्ये कोरोनाच्या या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केला आहे.
टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका