शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

ऑपरेशन ब्लू पीकॉक: कोंबड्यांच्या मदतीनं रशियाला उद्ध्वस्त करणार होता 'हा' देश, वाचा थरारक कहाणी...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 8:44 PM

1 / 10
दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेलं शीतयुद्ध संपून आता बराच काळ लोटला आहे. पण आताही याबाबत काही धक्कादायक खुलासे होत आहेत. देश शस्त्र आणि दारुगोळ्याबाबत नवनवे प्रयोग करत होते.
2 / 10
प्रत्येक देश काहीतरी घातक करण्यासाठी क्रूर मार्गांचा अवलंब करत होता. पण यात ब्रिटीश आर्मीनं सर्वांना मागे टाकलं. त्यांनी थेट कोंबड्यांचा वापर न्युक्लियर स्फोटासाठी करण्याचं ठरवलं होतं. या प्रोजेक्टला नावं देखील तितकंच अजब ठेवण्यात आलं होतं ते म्हणजे ऑपरेशन ब्लू पीकॉक.
3 / 10
रशिया जर आक्रमक झालाच तर जशास तसं उत्तर देण्यासाठी शीत युद्धात अनेक देशांनी आपली तयारी करुन ठेवली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका, युरोप आणि ब्रिटननं मिळून सोवियत संघाविरोधात उभे ठाकले होते. ही लढाई भांडवलशाही आणि साम्यवाद यांच्यात होती. खरंतर प्रत्यक्षात कोणतीही लढाई झाली नाही, पण लढण्याची पूर्ण तयारी नक्कीच केली गेली होती.
4 / 10
ब्रिटन आपलं वर्चस्व हळूहळू गमावू लागला होता. पण युद्धाच्या बाबतीत देश मागे राहिला तर चालणार नाही याच उद्देशानं या देशानं भयानय योजना आखली होती.
5 / 10
पन्नासच्या दशकाच्या सुरुवातीस युनायटेड किंडमने पश्चिम जर्मनीमध्ये जमिनीखाली एक सुरुंग लावला होता. जेणेतरुन सोव्हिएत युनियनने युरोपमधून हल्ला केल्यास वाटेतच उत्तर देता येईल. या भूसुरुंगाला ऑपरेशन ब्लू पीकॉक असे नाव देण्यात आले होते. भूसुरुंगांवर पाण्यासारखा पैसा खर्च करण्यात आला होता.
6 / 10
रॉयल आर्मेमेंट रिसच अँड डेव्हलपमेंट एस्टेब्लिशमेंटनं (RARDE) प्रोजेक्ट अत्यंत गुप्त पद्धतीनं डिझाइन केला होता. लँडमाइन काही सर्वसामान्य सुरुंग नव्हता. तर यातील प्रत्येक बॉम्ब जवळपास ८ किलोटन इतक्या वजनाचा होता. तुलना करायची झाली तर नागासाकी येथे झालेल्या अणुहल्ल्याच्या अर्ध्या ताकदीचा एक बॉम्ब होता. याचा स्फोट झाला असता तर सोव्हिएत संघाचं सैन्य क्षणार्धात नष्ट झालं असतं. इतकंच काय तर युरोपचाही मोठा भूभाग रेडियोअॅक्टीव्हचा शिकार झालं असतं.
7 / 10
जर्मनीला देखील याची पूर्ण माहिती नव्हती. जर्मनीला विश्वास होता की रशियाशी शत्रूत्व असलेला ब्रिटन देश आपल्या बाजूनं उभा राहील. पण नंतर लिक झालेल्या पॉलिसी पेपरमधून जर्मनीलाही ब्रिटनच्या थरारक इरादे कळून चुकले होते. अणुस्फोटानं सोव्हिएतला जबर धक्का बसला असताच पण त्यासोबतच रेडियोअॅक्टीव्ह किरणांच्या भीतीमुळे पुढे कधीच यूरोपकडे कुणी डोळे वटारुन पाहिलं नसतं, असं त्या पेपरमध्ये स्पष्ट लिहिलं होतं.
8 / 10
ब्रिटनच्या या महत्वाकांक्षी योजनेत एक तांत्रिक कमतरता देखील होती. उत्तर जर्मनीमध्ये सुरुंग लावण्यात आले होते तिथं हिवाळ्यात तापमान खूप कमी असतं. अंडरग्राऊंडला तर तापमान ऋण अंश सेल्सियसमध्ये असतं. या तापमानात प्रोजेक्ट फेलही झाला असता. त्यावर अनेक उपाय सुचवले गेले पण कोणताच अचूक उपाय त्यावेळी सापडला नव्हता.
9 / 10
एक कल्पना अशीही सुचवली गेली होती की जिवंत कोंबंड्यांसोबत बॉम्बचं पॅकेजिंग केलं जावं. सोबत आठवड्याभराचं दाना-पाणी देखील ठेवावं. कोंबड्यांच्या उबेमुळे बॉम्ब आणि सुरुंगातही वातावरण उबदार राहिल असा यामागचा उद्देश होता. ब्रिटीश सैन्यानं त्यासाठीची तयारी देखील पूर्ण केली होती. पण त्यावेळी पॉलिसी पेपर लिक झाला आणि ही माहिती सर्वांसमोर उघड झाली. त्यानंतर जर्मनीसह संपूर्ण युरोपात कहर झाला.
10 / 10
१९५८ साली संरक्षण मंत्रालयानं ऑपरेशन ब्लू पीकॉक तातडीनं बंद करण्याचा आदेश दिला. कारण या योजनेमुळे शत्रुराष्टासोबतच मित्र देशांचंही नुकसान झालं असतं. ५० च्या दशकाच्या अखेरीस रोखण्यात आलेल्या या ऑपरेशनची माहिती सर्वसामान्य लोकांना २००४ साली कळाली. ज्यावेळी ही योजना गोपनीय माहितीच्या लिस्टमधून काढून टाकली गेली होती.
टॅग्स :russiaरशिया