Oxford corona vaccine 90 percent pass; Still skeptical of researchers
Corona Virus News: ऑक्सफर्डची लस 90 टक्के पास; तरीही संशोधक साशंक, जाणून घ्या कारण... By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2020 9:10 AM1 / 10कोरोना व्हायरसच्या उत्पातामुळे जगभराचे लक्ष कोरोना लसीकडे लागले आहे. अनेक देश कोरोना लस बनविण्याच्या शर्यतीत आहेत. तर काही देशांनी ती बनविली आहे. या लसींची चाचणीदेखील अंतिम टप्प्यात आहे. अशावेळी भारताला ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझिनेका लसीकडून मोठी आशा होती. या लसीच्या चाचण्यांचे निकाल सोमवारी जाहीर करण्यात आले. 2 / 10सिरम इन्सि्टिट्यूट उत्पादन घेत असलेल्या या लसीचा 90 टक्के चांगला परिणाम दिसून आला आहे. कोरोना महामारीमुळे जगाची चाके थांबली होती. अमेरिका, युरोपसारखे मोठमोठे देश मेटाकुटीला आले होते. यामुळे कोरोना लसीची चातकाप्रमाणे वाट पाहिली जात होती. 3 / 10यानुसार ज्या कंपन्यांनी कोरोना लस बनविली आहे, त्यांनी कोणतेही गंभीर परिणाम दिसले नसल्याचा दावा केला आहे. मात्र, तरीही हे संशोधक लसींच्या सुरक्षेवर संशय व्य़क्त करत आहेत. 4 / 10चीनने दोन, रशियाने दोन, अमेरिकेची फायझर, मॉडर्ना आणि युरोपची ऑक्सफर्ड विद्यापीठ-अॅस्ट्राझिनेका कंपनीने मिळून तयार केलेली लस मुख्य शर्यतीत आहेत. कोणाची लस 94 टक्के, कोणाची 90 टक्के परिणामकारक दिसून आली आहे. 5 / 10वर्षभरातच ही लस बिनविण्यात आल्याने ही लस किती दिवस सुरक्षा देईल याबाबत कोणीच काही सांगू शकत नाहीय. अशा अनेक आजारांच्या लसी आहेत, ज्या आयुष्य़भर त्या आजारांपासून इम्य़ुनिटी टिकवून ठेवतात. तर काही लसी या 90 दिवसांचीच इम्युनिटी देतात. यामुळे कोरोनाची लस किती दिवसांपर्यंत इम्युनिटी वाढवेल याबाबत संशोधकांनाही काहीच सांगता येत नाहीय. 6 / 10आजतकने ऑक्सफर्ड लसीचे व्हॅक्सिनॉलॉजिस्ट एड्रियन हिल यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितले की, आम्ही ज्या लोकांना लस टोचली त्यांना महिनाभरतरी हॉस्पिटलमध्ये जावे लागले नाही. जगात तीन चांगल्या लसी अंतिम टप्प्य़ात आहेत ही चांगली बाब आहे7 / 10कोरोना व्हायरस खरेतर एक ग्रुप आहे, जो सर्दी, खोकल्यासारखे आजार देतो. अमेरिकेचे संक्रमण विभागाचे प्रमुख डॉ एंथनी फाउची यांनी सांगितले की, या कोरोना व्हाय़रसचा इतिहास पाहता त्यांच्यावरील औषधांची इम्युनिटी ही सहा महिने ते वर्षभर राहते. 8 / 10डॉ अटाणु बिस्वास यांनी सांगितले की, SARS आणि MERS मध्ये अँटीबॉडी लेव्हल एक किंवा दोन वर्षांत मोठ्या प्रमाणावर कमी झाली. यामुळे कोरोनामध्ये हीच सिस्टिम कधीपर्यंत तग धरेल? काही संशोधनांनुसार कोरोना रुग्ण बरे झाले तरी काही महिन्यांनी त्यांच्यातील अँटीबॉडी लेव्हल घसरली. 9 / 10अशा प्रकारमुळे अनेकांना असे वाटत आहे कीस कोरोना लसीबाबतही असेच घडेल. कदाचित ही लस एक किंवा दीड वर्षाने बेअसर ठरू शकेल. याचबरोबर एकसारख्याच लोकसंख्येमध्ये कोरोना लसीचा वेगवेगळा प्रतिसाद मिळू शकेल, असे ते म्हणाले.10 / 10लस टोचल्यानंतर जर इम्युनिटी अधिक काळ राहिली नाही तर पुन्हा पुन्हा कोरोना लस टोचावी लागणार आहे. असे झाल्यास शेवटच्या व्यक्तीला कोरोना लस खूप विलंबाने मिळण्याची शक्यता आहे. तसेच लसही मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications