Paedophiles forced to undergo chemical castration Kazakhstan beg for forgiveness on Tv
इथे रेपच्या दोषींना जबरदस्ती बनवलं जात आहे नपुंसक, कैदी मागत आहे दयेची भीक By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 4:06 PM1 / 9कझाखस्तानमध्ये बाल लैंगिक शोषण गुन्ह्यात दोषी आढळणाऱ्या सर्वच पुरूषांविरोधात कठोर कायदे तयार केले आहेत. देशात बाल लैंगिक शोषणातील दोषींना नपुंसक बनवलं जात आहे. प्रशानस लैंगिक गुन्हे करणाऱ्यांना तंबी देण्यासाठी मीडियातून अभियान चालवत आहे. याच क्रमात इंजेक्शनच्या माध्यमातून नपुंसक बनण्यासाठी भाग पाडलेल्या एका दोषीला टीव्हीवर दयेची भीक मागताना बघण्यात आलं.2 / 9'डेली मेल' च्या एका रिपोर्टनुसार, कजाखस्तानमध्ये नियमितपणे इंजेक्शन देऊन अशा गुन्हेगारांना नपुंसक बनवलं जात आहे. तुरूंगात मोठी शिक्षा भोगल्यावरही गुन्हेगारांना यातून सुट मिळत नाहीये. तुरूंगातून बाहेर आल्यावरही या गुन्हेगारांना इंजेक्शन दिलं जात आहे.3 / 9नपुंसक बनण्याच्या प्रक्रियेतून जात असलेल्या एका गुन्हेगाराने पहिलं इंजेक्शन लावल्यावर याला टीव्हीवर क्रूरता म्हटलं आहे. तसेच त्याने यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तो म्हणाला की तो त्याच्या सर्वात मोठ्या वैऱ्यालाही अशी शिक्षा देण्याचा विचार करणार नाही.4 / 9तो म्हणाला की, 'मला माहीत आहे की, हे माझ्या शरीरासाठी हानिकारक आहे. मला हे माहीत आहे की, याने भविष्यात माझं आरोग्य प्रभावित होईल'. एका दुसरा गुन्हेगार म्हणाला की, 'आता मला पश्चाताप होत आहे की, मी असा गुन्हा केला. मी माझ्या उदाहरणावरून दुसऱ्या हे सांगतो की, त्यांनी अशाप्रकारचा भयानक गुन्हा करू नये. मी त्या लोकांकडे भीक मागतो ज्यांनी मला नपुंसक बनवण्याचा आदेश दिला. त्यांनी आपला निर्णय बदलायला हवा. माझं वय फार कमी आहे'.5 / 9अल्पवयीनसोबत बलात्कार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोषी मरातनेही आपलं दु:खं जाहीर केलं. त्याने सांगितलं की, कशाप्रकारे त्याला आतापर्यंत तुरूंगात नपुंसक बनवण्याचे तीन इंजेक्शन देण्यात आले.6 / 9मरातला बलात्काराच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात १५ वर्षांची शिक्षा झाली होती. तो म्हणाला की, 'हे माझ्या पुरूषार्थाच्या दृष्टीने फारच खराब आहे. मला पुरूषार्थाची गरज आहे. मला नपुंसक का बनवलं जात आहे? मला माहीत आहे की, मी दोषी आहे आणि मला जगायचं आहे. माझ्याकडे अजूनही माझा परिवार आणि माझी मुले आहेत'.7 / 9१४ वर्षाच्या एका मुलीसोबत बलात्कारात दोषी आणखी एक ५० वर्षीय गुन्हेगार या शिक्षेवरून भीक मागताना दिसला. त्याला १७ वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे. त्याला यावर्षी फेब्रुवारीमध्ये तुरूंगात पाठवण्यात आलं. तो म्हणाला की, 'माझ्या घरी मुलं आहेत. त्यातील काही अल्पवयीन आहेत. ते म्हणतात की आता मलाही नपुंसक होण्याच्या प्रक्रियेचा सामना करावा लागेल'.8 / 9कजाखस्तान सरकारचा दावा आहे की, त्यांच्या या कठोर नियमाने लहान मुलांवर होत असलेल्या हल्ल्यात १५ टक्के कमतरता आली आहे. पण बाल लैंगिक शोषणाचे आकडे वाढले आहेत. असं मानलं जात आहे की, अशा घटना रिपोर्टिंगमुळे वाढलेल्या दिसत आहे.9 / 9लैंगिक अत्याचारातील गुन्हेगारांसाठी बनवलेल्या तुरूंगातील बलात्काराच्या दोषींना नपुंसक बनवण्याची जबाबदारी सांभाळणारी नर्स म्हणाली की, पश्चिमी देशांनीही कझाखस्तानचा हा कायदा आपल्या इथे लागू केला पाहिजे. ६९ वर्षीय जोया मानेन्कोने ही शिक्षा योग्य असल्याचं म्हटलं आहे. तुरूंगाच्या हॉस्पिटलमद्ये काम करणारी जोया म्हणाली की, बाल लैंगिक शोषण करणाऱ्या गुन्हेगारांना अशीच शिक्षा दिली गेली पाहिजे. या लोकांना कशाप्रकारे तरी रोखण्याची गरज आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications