बांगलादेशमध्ये पाकिस्तान समर्थित लष्करी तख्तापालट करण्याचा प्रयत्न फसला; लेफ्टनंट जनरल नजर कैदेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 09:49 IST
1 / 6गेल्या काही महिन्यांपासून अस्थिर असलेल्या बांगलादेमध्ये मोठी घडामोड घडली आहे. तेथील अस्थिर राजकीय वातावरणाचा फायदा उचलण्याचा पाकिस्तानचा आणि पाकिस्तानी समर्थक लेफ्टनंट जनरलचा बांगलादेशी लष्कर ताब्यात घेण्याचा इरादा फसला आहे. याची माहिती मिळताच लेफ्टनंट जनरलला नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत बांगलादेशमध्ये मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. 2 / 6पाकिस्तानी आयएसआयच्या साथीने बांगलादेशचे लष्कर प्रमुख वकार उज जमान यांची उचलबांगडी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. बांगलादेश आर्मीचे लेफ्टनंट जनरल फैजुर रहमान यांनी हा प्रयत्न केला आहे. त्यांनी जमान यांची जागा घेण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू, त्यांना पुरेसे समर्थन न मिळाल्याने प्रयत्न फसला आहे. रहमान हे पाकिस्तानी समर्थक आणि जमात ए इस्लामी समर्थक आहेत. 3 / 6जनरल रेहमान यांनी बांगलादेशमध्ये आपल्या ताकदीची टेस्ट घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतू, त्यांनी बोलविलेल्या बैठकीला लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याने त्यांचा हा प्रयत्न फसला. याबाबतचे वृत्त ईटीने दिले आहे.4 / 6यानंतर बांगलादेश लष्कर सावध झाले असून रेहमान यांना लष्करी गुप्तचर विभागाच्या डीजीएफआयच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. पुढील काही दिवसांत ढाक्यात मोठ्या घडामोडी घडू शकतात, असे सांगितले जात आहे.5 / 6या कटात बांगलादेशच्या अनेक लष्करी अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे समजते आहे. जवळपास १० अधिकाऱ्यांची नावे समोर आली आहेत. यामध्ये मेजर जनरल मीर मुशफिकुर रेहमान यांचा समावेश आहे. 6 / 6रेहमान यांनी जानेवारीत पाकिस्तानी आयएसआयच्या प्रमुखांशी चर्चा केली होती. यानंतर पाकिस्तानी अधिकारी भारतासाठी महत्वाच्या असलेल्या चिकन नेकपरिसरात आले होते. आता या भेटीगाठींचा अर्थ समोर येत आहे.