pakistan damage to buddhist heritage in pok india warns imran khan empty illegal occupation
PoKमध्ये बौद्धांच्या वारशाला धक्का; गिलगिट-बाल्टिस्तान रिकामी करा; भारताचा पाकला कडक इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2020 10:16 PM1 / 10पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) बौद्ध वारशासोबत छेडछाड केल्याप्रकरणी भारतानं तीव्र आक्षेप नोंदवला आहे. 2 / 10भारताने पाकिस्तानला या भागावरचा बेकायदा मिळवलेला ताबा लवकरात लवकर सोडण्याचा इशारा दिला आहे. 3 / 10गेल्या काही दिवसांपासून पीओकेमधील बौद्ध पुरातत्त्व स्थळांची नासधूस करण्यात येत आहे. त्याला भारतानं तीव्र विरोध दर्शवला आहे. 4 / 10परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, “गिलगिट-बाल्टिस्तान”च्या भारताच्या भागावर पाकिस्ताननं बेकायदेशीररीत्या कब्जा मिळवला आहे. 5 / 10तसेच या भागावर कब्जा करून ते भारतीय बौद्ध वारशाची तोडफोड करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं गंभीर चिंता व्यक्त केली आहे.6 / 10परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले की, पीओकेमधली बौद्ध प्रतीकं हळूहळू नष्ट केली जात आहेत. 7 / 10पाकिस्तान बेकायदेशीरपणे व्यापलेल्या या भारतीय भूभागांमधील धार्मिक, सांस्कृतिक हक्क आणि स्वातंत्र्याची निर्दयीपणे गळचेपी करत आहे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. प्राचीन संस्कृती आणि सांस्कृतिक वारशाचा तिरस्कार करणं हे निंदनीय आहे. 8 / 10परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, हा अनमोल पुरातत्त्व वारसा पुनर्संचयित व जतन करण्यासाठी भारताच्या क्षेत्रातील तज्ज्ञांना त्वरित द्यावा, अशी मागणी आम्ही केली आहे. आम्ही पुन्हा एकदा पाकिस्तानला तात्काळ सर्व बेकायदेशीर व्यापलेली जागा रिकामी करण्यास सांगत आहोत. 9 / 10पाकिस्तानकडून तेथील रहिवाशांच्या राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक हक्कांची भयंकर पद्धतीनं पायमल्ली केली जात आहे. ते रोखण्यास आम्ही पाकिस्तानला वारंवार बजावले आहे. गिलगिट-बाल्टिस्तान क्षेत्रात निवडणुका घेण्याच्या पाकिस्तानच्या अधिकार्यांच्या निर्णयाचा भारताने विरोध केला होता. भारत हा भूभाग नेहमीच स्वतःचा मानत आला आहे. 10 / 10जम्मू-काश्मीरच्या काही भागात पाकिस्तानने 70 वर्षांहून अधिक काळ बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे. स्वातंत्र्यानंतर काश्मीरचे विलीनीकरण झाले नाही, तेव्हापासून या भागांवर पाकिस्ताननं कब्जा मिळवला आहे. परंतु त्यानंतरही पाकिस्तानने आपला ताबा कायम ठेवला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications