शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानची दयनीय स्थिती, श्रीलंकेसारखी अवस्था होण्याची वेळ; एक कप चहादेखील मिळणे अवघड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 9:45 PM

1 / 7
पाकिस्तानची स्थिती दयनीय आहे. पाकिस्तानातील आर्थिक संकट इतके वाढले आहे की लोकांना आता दैनंदिन वस्तू खरेदी करण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. पाकिस्तान आता सर्वच गोष्टींसाठी अवलंबून आहे. आता परिस्थिती अशी झाली आहे की पाकिस्तानला कुठूनही दिलासा मिळत नाहीये.
2 / 7
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानचा रुपया 275 या ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडेही मोडले आहे. मैदा, डाळ, तांदूळ, दूध अशा वस्तूंच्या टंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांना आणखी एक धक्का बसला आहे.
3 / 7
ताटातील भाकरीप्रमाणे आता चहादेखील (Tea Crisis In Pakistan) त्यांच्या कपातून गायब होऊ लागले आहे. पाकिस्तानात चहाचे भाव गगनाला भिडले आहेत. पाकिस्तानकडे डॉलर नाहीत आणि 250 विदेशी कंटेनर देशाच्या बंदरांवर अडकले आहेत.
4 / 7
जोपर्यंत पाकिस्तान त्यांना पैसे देत नाही तोपर्यंत चहा मिळणार नाही. त्यामुळेच चहाचे भाव गगनाला भिडू लागले आहेत. पाकिस्तानमध्ये सुट्या चहाची किंमत 1600 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. 15 दिवसांपूर्वी ही किंमत 1100 रुपये प्रति किलो होती.
5 / 7
पाकिस्तानची अर्थव्यवस्था बुडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. फायनॅन्शिअल टाईम्सच्या रिपोर्टनुसार, पाकिस्तानची स्थिती हळूहळू श्रीलंकेसारखी होत आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस घसरत आहे. पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या साठ्यातही मोठी घट झाली आहे. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या मालाचे शेकडो कंटेनर बंदरात अडकून पडले आहेत.
6 / 7
पाकिस्तानी रुपयाने विक्रमी नीचांकी पातळी गाठली आहे. पाकिस्तानची अवस्था इतकी बिघडली आहे की त्यांना पैशांसाठी आपल्या मित्रराष्ट्रांकडे हात पसरावे लागत आहे. या बिकट परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी धडपडत असलेल्या पाकिस्तानला कोणत्याही देशाची मदत मिळताना दिसत नाहीये.
7 / 7
पाकिस्तानच्या चलनाची स्थिती अत्यंत वाईट आहे. पाकिस्तानी चलनाची स्थिती अत्यंत वाईट आहे. पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत 230.93 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. गेल्या तीन महिन्यांत पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत 12 रुपयांनी घसरला आहे.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानEconomyअर्थव्यवस्था