शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

लाहोर, कराची अन् इस्लामाबाद...; इराणच्या 'या' ७ मिसाईल पाकिस्तान उद्ध्वस्त करतील

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 3:12 PM

1 / 10
यूएस सेंट्रल कमांडचे जनरल केनेथ मॅकेन्झी यांनी २०२२ मध्ये सांगितले होते की, इराणकडे ३००० पेक्षा जास्त बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा साठा आहे.संपूर्ण मध्य पूर्वमध्ये इराणकडे सर्वात जास्त क्षेपणास्त्रे आहेत. क्षेपणास्त्रांचे विविध प्रकार आहेतच असे नाही तर इराणकडे प्रत्येक रेंजची क्षेपणास्त्रे आहेत.
2 / 10
पाकिस्तानपासून इराणचे हवाई अंतर १५०० किलोमीटर आहे. इराणला जर वाटलं तर ते त्यांच्या पश्चिम सीमेवरून क्षेपणास्त्रे डागून कराची बंदर उडवू शकतात. बलुचिस्तानच्या अनेक भागात विध्वंस होऊ शकतो. पण इराण पाकिस्तानशी जवळपास १००० किमीची सीमा आहे
3 / 10
इराणने आपली बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे सीमेजवळून डागली तर मग पेशावर, इस्लामाबाद, लाहोर, कराची किंवा क्वेटा असो. काहीच उरणार नाही. संपूर्ण पाकिस्तान नष्ट होईल. एवढेच नाही तर इराणचे संपूर्ण लक्ष २००० किलोमीटरपेक्षा जास्त पल्ल्याची शक्तिशाली क्षेपणास्त्रे बनवून ते देशात तैनात करण्यावर आहे.
4 / 10
Shahab -3 : शहाब-३ हे इराणची मीडियम रेंजची बॅलेस्टिक मिसाईल आहे. ही मिसाईल उत्तर कोरियाच्या नोडोंग-१ क्षेपणास्त्रावर आधारित आहे. त्याची रेंज १००० ते २००० किलोमीटर आहे. त्यावर शस्त्र किती वजनाने बसवले जाते यावर ते अवलंबून असते. नवीन मॉडेलमध्ये क्लस्टर युद्धसामग्रीचा पर्यायही आहे. म्हणजे एकाच क्षेपणास्त्राने पाच ठिकाणांवर हल्ला केला जाऊ शकतो. ते ४०० किलोमीटरच्या कमाल उंचीवर पोहोचू शकते. त्याचा वेग २.४ किलोमीटर प्रति सेकंद आहे.
5 / 10
Ghadr - हीदेखील मीडियम रेंजची मिसाईल आहे. तिची रेंज १८०० ते २००० किलोमीटर आहे. तिचा वेग अतिशय भयानक आहे. म्हणजेच ती ११,११३.२ किमी/तास वेगाने टार्गेटकडे जाते. याला अँटी सॅटेलाईट मिसाईल आणि IRBM या कॅटेगिरीतही ठेवण्यात आले आहे. जर ती लक्ष्यापासून ११० मीटरच् रेडियसमध्ये कुठेही पडली तर ते टार्गेट नष्ट करते.
6 / 10
Emad - हे क्षेपणास्त्र लिक्विड फ्युएल मीडियम रेंजचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. त्याचा व्यास १.२५ मीटर आहे. यात एकच वॉरहेड वापरला जातो. ज्याचे वजन ७५० किलो आहे. त्याची CEP १० मीटर आहे. म्हणजे जर ते लक्ष्याच्या ५-१० मीटरच्या आत आले तर लक्ष्य पूर्णपणे नष्ट होईल. त्याची रेंज १७०० किलोमीटर आहे. ते शहाब-3 क्षेपणास्त्रासारखे दिसते. २०१६ पासून इराणचे लष्कर त्याचा वापर करत आहे.
7 / 10
Khorramshahr-1, 2, and 4 - खोरमशहरची अनेक व्हेरिएंट आहेत. ही सर्व मीडियम रेंजची बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे आहेत. त्यांचे वजन १९.५ टन आहे. १३ मीटर लांबीच्या क्षेपणास्त्राचा व्यास दीड मीटर आहे. ते लिक्विड फ्यूएल रॉकेट इंजिनच्या मदतीने उडते. त्याची रेंज २००० किलोमीटर आहे. त्यात १८०० किलो वजनाची शस्त्रे लोड करता येतात. त्याचा वेग ९८७८ किमी/तास ते १७,२८७ किमी/तास आहे. याचाच अर्थ पाकिस्तानच्या कोणत्याही टार्गेटला उद्ध्वस्त करायला एक सेकंदही वेळ लागणार नाही.
8 / 10
Fattah - फतह हे हायपरसोनिक मीडियम रेंजचे क्षेपणास्त्र आहे. यामध्ये ३५० ते ४५० किलो वॉरहेड म्हणजेच शस्त्रे बसवता येतात. सॉलिड इंधन इंजिनसह उड्डाण घेते. त्याची रेंज १४०० किलोमीटर आहे. वेग १६,०५२ किमी/तास ते १८,५२२ किमी/तास आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे त्याची मॅन्यूवॅरिबिलीटी. ही मिसाईल कधीही कोणत्याही दिशेने वळवली जाऊ शकते. हे क्षेपणास्त्र कोणत्याही रडारलाही दिसत नाही.
9 / 10
Kheibar Shekan - खैबर शेकन हे देखील मीडियम रेंजचे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र आहे. साडेचार टन वजनाच्या क्षेपणास्त्राची लांबी १०.५ मीटर आहे. व्यास ८० सेंटीमीटर आहे. त्यात ५०० किलो वजनाचे वॉरहेड बसवले जाऊ शकते. त्याची रेंज १४५० किलोमीटर आहे. कोणत्याही हवाई संरक्षण यंत्रणेला चकवा देण्यासाठी हे विशेष मॅन्युव्हरेबिलिटी तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. त्याचा वेग ४९३२ ते ६१७४ किलोमीटर प्रति तास आहे.
10 / 10
Sejjil - सेजिल क्षेपणास्त्रदेखील सॉलिड इंधन असलेले मीडियम रेंजचे क्षेपणास्त्र आहे. २२.५ टन वजनाच्या क्षेपणास्त्राची लांबी १८.२ मीटर आहे. यामध्ये ५०० ते १५०० किलो वजनाची वॉरहेड्स बसवता येतात. तिची गती ही त्याला सर्वात प्राणघातक बनवते. ते १७,४८७ किमी/तास वेगाने उडते. त्याची रेंज २००० ते २५०० किलोमीटर आहे. हायब्रीड मोड क्षेपणास्त्र वापरल्यास ते ४५०० किलोमीटरपर्यंत मारा करू शकते.
टॅग्स :IranइराणPakistanपाकिस्तान