Pakistan ISI changed names of Jaish-e-Mohammed and Lashkar-e-Taiba; may attack on Jammu and Kashmir
Pakistan Terrorist: पाकिस्तानची मोठी खेळी! जम्मू-काश्मीरवर हल्ल्यासाठी जैश व लश्करची नावे बदलली By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2021 4:22 PM1 / 7इस्लामाबाद: पाकिस्तान (Pakistan) मध्ये जगातील निम्म्याहून अधिक दहशतवादी संघटना आहेत. भारताला त्रास देण्यासाठी पाकिस्तानने गेली कित्येक वर्षे या संघटनांना पोसले आहे. यामुळे पाकिस्तान भिकेला लागला असून कोणी कर्जही देत नाहीय. यामुळे काळ्या यादीत जाण्याच्या शक्यतेबरोबरच दहशतवाद्यांचा पालनकर्ता हा शिक्का पुसण्यासाठी पाकिस्ताने मोठी खेळी खेळत आहे. 2 / 7जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) आणि लश्कर-ए-तोयबा (Lashkar-e-Taiba) यांच्यावर होऊ शकणारी FATF सह आंतरराष्ट्रीय संघटनांची कारवाई वाचविण्यासाठी नाव बदलण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. नाव बदलून या संघटना आपल्या दहशतवादी कारवाया सुरुच ठेवणार आहेत. 3 / 7गुप्तचर संघटनांच्या वरिष्ठ सुत्रांनुसार लश्कर-ए-तोयबा दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यापासून ते स्लीपर सेल बनविण्यासाठी अल बुर्क (Al Burq) या नावाने काम करत आहे. याच नावाने दहशतवादी कारवाया सुरु केल्या आहेत.4 / 7 पाकिस्तानची आयएसआय देखील उघडउघड या संघटनेची मदत करत आहे. कारण अल बुर्क हे नाव अद्याप आंतरराष्ट्रीय स्तरावर काळ्या यादीत गेलेले नाही. 5 / 7पाकिस्तानची आणखी एक दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद आता अल उमर मुजाहिदीन ( Al umar Mujahedeen) या नावाने सक्रीय झाली आहे. या बोगस नावाने ही संघटना आणि पाकिस्तान दहशतवादी कृत्ये पुढे सुरु ठेवू शकतील. आयएसआय आता याच नव्या नावांनी दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत आहे. भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक तपाससंस्थांना याची माहिती मिळाली आहे.6 / 7दुसरीकडे अशी बातमी आहे की, अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबानसाठी लढलेले दहशतवादी आता जम्मू-काश्मीरमध्ये घुसविले जाणार आहेत. गुप्तचर सुत्रांनुसार पीओकेमध्ये या दहशतवाद्यांचा तळ असून मोठ्या प्रमाणावर दहशतवादी जमा झाले आहेत. 7 / 7आयएसआय अधिकारी, सायबर दहशतवादी, तालिबान आणि या दोन संघटनांचे दहशतवादी पीओकेमध्ये अफगाणिस्तानची सिमकार्ड वापरत आहेत. सध्या या भागात 3000 हून अधिक अफगाणि सिमकार्ड अॅक्टिव्ह दिसत आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications