शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

आधी एका मुख्यमंत्र्याचा त्याग आणि आता एका...; पद वाचवण्यासाठी Imran Khan यांची अखेरची धडपड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2022 5:37 PM

1 / 10
Pakistan Political Crisis: मागील काही महिन्यांपासून पाकिस्तानमध्ये राजकीय संकट सुरू आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना सत्ता वाचवण्यासाठी १७२ खासदारांचा पाठिंबा हवा. मात्र, त्यांच्याच पक्षातील काही खासदारांनी बंडाळी केली आहे. त्यामुळे इम्रान खान यांचे सरकार अल्पमतात आले आहे. सत्तेत कायम राहण्यासाठी इम्रान खान यांना मोठे डावपेच आखावे लागणार आहेत.
2 / 10
इम्रान खान यांच्याविरोधात पाकिस्तानच्या संसदेत अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यामुळे संसदेचे कामकाज ३१ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आले. ३१ मार्च रोजी दुपारी ४ वाजता या अविश्वास प्रस्तावावरील मतदान इम्रान खान सरकारचे भवितव्य ठरणार आहे.
3 / 10
परंतु आता इम्रान खान हे आपलं पद वाचवण्यासाठी अखेरची धडपड करताना दिसत आहे. अविश्वास प्रस्तावाचा सामना करत असलेल्या इम्रान खान (Imran Khan) यांनी पंजाब प्रांतातील मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर आपल्या पक्षाच्या नेत्याला हटवून मित्रपक्षाच्या नेत्याला बसवलं आहे. आता पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री हे परवेझ इलाही हे असतील.
4 / 10
इलाही हे पाकिस्तान मुस्लीम लिग-कायदा (PML-Q) चे नेते आहेत. त्यांचा पक्ष इम्रान खान यांच्या तहरी-ए-इन्साफ (PTI) चा मुख्य मित्रपक्ष आहे. नॅशनल असेंबलीमध्ये त्यांच्याकडे पाच खासदार आहेत. इलाही यांच्यापूर्वी उस्मान बजदर हे पंजाबचे मुख्यमंत्री होते. त्यांनी सोमवारी संध्याकाळी आपला राजीनामा दिला.
5 / 10
त्यांच्या राजीनाम्यानंतर PML-Q च्या नेत्यांनी संध्याकाळी उशिरा पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी संसदेत त्यांच्या समर्थनाची घोषणाीही केली.
6 / 10
याशिवाय नाराज असलेल्या मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट-पाकिस्तान (MQM-P) ला सोबत घेण्याचे प्रयत्नही इम्रान खान यांनी सुरू केले आहेत. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार PTI आणि MQM-P च्या नेत्यांमध्ये सोमवारी बैठक पार पडली. यामध्ये इम्रान खान यांना समर्थन देण्यास ते तयार झाल्याचं सांगण्यात येत आहे. याबदल्यात MQM-P ला मॅरिटाईम मिनिस्ट्री देण्यास तयार असल्याचंही सांगण्यात आलंय.
7 / 10
सिंध प्रांताचे गव्हर्नर इमरान इस्मायल यांनी स्थानिक माध्यमांना माहिती देत सरकारसोबत चर्चा झाल्याचं सांगितलं. तसंच MQM-P च्या सर्व अटी सरकानं मान्य केल्या आहेत आणि नाराज मित्रपक्षांना सोबत आणण्याचेही पूर्ण प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.
8 / 10
पाकिस्तानमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय संकटादरम्यान आता अफवाही उडू लागल्या आहेत. सोमवारी, इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाच्या नेत्या डॉ. फिरदौस आशिक अवान माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पक्ष पीएमएल-एनमध्ये सामील झाल्याच्याही अफवा पसरल्या होत्या. डॉक्टर फिरदौस यांनी नवाझ शरीफ यांच्या पक्षात जाण्याची इच्छा व्यक्त केल्याचे वृत्त होते. मात्र, नंतर त्यांनी हे वृत्त फेटाळत केवळ अफवा असल्याचं म्हटलं.
9 / 10
सध्या इम्रान खान नाराज लोकांनाही एकत्र आणण्याचे प्रयत्न करत असले तरी त्यांच्या खुर्चीवरील धोका टळलेला नाही. त्यांच्याविरोधात सोमवारी पाकिस्तानी संसदेत अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. आता संसदेचं पुढील कामकाज ३१ मार्च रोजी होईल.
10 / 10
नॅशनल असेंबलीमध्ये ३४२ सीट्स आहेत. इम्रान खान यांना आपलं सरकार वाचवण्यासाठी १७२ मतांची गरज आहे. त्यांच्याकडे सध्या १५५ सदस्य आहेत. परंतु २४ खासदारांनी बंडखोरी केली आहे. तर दुसरीकडे इम्रान खान यांचे मित्रपक्षही नाराज आहेत.
टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान