पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी चीनकडून शस्त्रसाठा खरेदी करण्याच्या तयारीत By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 4:23 PM1 / 10भारताला अस्थिर करण्यासाठी पाकिस्तान आता नवीन षड्यंत्र रचत आहे. दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तान चीनकडून आवश्यक साहित्य आणि शस्त्रास्त्रे खरेदी करीत आहे, जेणेकरुन भारतीय सुरक्षा दलांना लक्ष्य केले जाऊ शकेल.2 / 10सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यासंबधीचे वृत्त आजतक या वृत्तवाहिनीने दिले आहे, त्यानुसार, पाकिस्तानने दहशतवाद्यांसाठी चीनकडून खरेदी करण्यात येणार असलेल्या साहित्यांची मोठी यादी तयार केली आहे.3 / 10सुत्रांच्या म्हणण्यानुसार, या यादीसंर्भातील अनेक करार चिनी सैन्याचे काही अधिकारी पाकिस्तानच्या दौऱ्यावर येतील, त्यावेळी फायनल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. जर सूत्रांचे मानले तर चीन पाकिस्तानला भरपूर शस्त्रसाठा देत आहे, ज्याचा वापर पाकिस्तान भारतात दहशतवाद पसरवण्यासाठी करू शकते.4 / 10पाकिस्तान चीनकडून सुमारे 3000-4000 'मिलिटरी कॉम्बॅट बॅलिस्टिक बुलेट प्रूफ जॅकेट्स' खरेदी करत आहे. जर सूत्रांचे मानले तर ही चिनी बुलेट प्रूफ जॅकेट पाकिस्तान सैन्य आपल्या 'मुजाहिद बटालियन'साठी वापरू शकेल. 5 / 10चीनकडून पाकिस्तान बलून बॉर्न स्पाय रडारही (Balloon-borne spy Radars) खरेदी करत आहे. पाकिस्तान हे रडार नियंत्रण रेषेच्याजवळील भागात तैनात करेल. तसेच, दहशतवादी घुसखोरीच्यावेळी या रडारांद्वारे पाकिस्तान सैन्य सीमेवर असलेल्या भारतीय सुरक्षा दलांच्या हालचालींवर नजर ठेवेल, अशी माहिती गुप्तचर सूत्रांकडून देण्यात आली आहे.6 / 10पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि सैन्य चिनीकडून मोठ्या संख्येने 'हाय अॅल्टिट्यूड साहित्य' खरेदी करीत आहेत. सुरक्षा यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानला सीमेवर दहशतवाद वाढवायचा आहे.7 / 10या कारणासाठी पाकिस्तान साहित्य खरेदी करत आहे. जेणेकरून येणाऱ्या काळात बर्फाळ पर्वतांवर हाय अॅल्टिट्यूड ड्रेस घालून दहशतवाद्यांना भारतीय सीमेवर पाठवता येईल. 8 / 10हाय अॅल्टिट्यूड ड्रेसच्या पूर्ण यादीनुसार पाकिस्तान एका चिनी कंपनीकडून 15 प्रकारचे हाय अॅल्टिट्यूड ड्रेसची खरेदी करीत आहे. यामध्ये हाय अॅल्टिट्यूड गॉगल, हार्नेस सीट, वॉर्म कॅप, डाउन शूट, हाय अॅल्टिट्यूड ग्लव्स, लेदर ग्लव्स, हाय अॅल्टिट्यूड ड्रिंकिंग वॉटर बॉटल, बीकन एव्हलॉंच, फोल्डेड लॅडर, वायर कटर, फेस प्रोटेक्टर, ग्लेशियर टोपी, पार्का जॅकेटचा समावेश आहे. 9 / 10पाकिस्तान चीनकडून 80 हजार राउंड स्टील बुलेट खरेदी करीत आहे. या स्टील बुलेट अतिशय धोकादायक आहेत. पाकिस्तानने या स्टील बुलेटचा वापर दहशतवाद्यांमार्फत जम्मू-काश्मीरमध्ये केला आहे.10 / 10पाकिस्तान सैन्याने मोठ्या संख्येने एसएच -15 हॉवित्झर तोफांच्या सौदा चीनच्या नॉर्दन इंडस्ट्रीज कॉर्पोरेशनसोबत केला आहे. गुप्तचर सूत्रांच्या माहितीनुसार, नियंत्रण रेषेवरील आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रास्त्रांची तैनात करण्यासाठी पाकिस्तानकडून सर्व खरेदी करण्यात आाली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications