पहिले मदतीचा हात, आता चर्चेसाठी तयार, पण...; पाकिस्तानच्या धोरणांत अचानक झाला बदल By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 5:57 PM1 / 15पुलवामा हल्ल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील औपचारिक चर्चा बंद झाली आहे. 2 / 15जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला चालना देत राहिल तोपर्यंत पाकिस्तानशी चर्चा करणे शक्य होणार नाही असं भारतानं स्पष्ट केलं आहे. 3 / 15आतापर्यंत पाकिस्ताननंही चर्चेच्या विरोधातच वक्तव्य केलं होतं. परंतु गेल्या काही महिन्यांपासून अचानक पाकिस्तानच्या रणनितीमध्ये मोठे बदल झाल्याचं दिसून येत आहे. 4 / 15सतत युद्धाच्या धमक्या देणाऱ्या पाकिस्ताननं भारतासोबत चर्चा करण्यास आपण तयार असल्याचंही म्हटलं आहे. 5 / 15चर्चेच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील मतभेद दूर करण्यासाठी आपण तयार असल्याचं वक्तव्य पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी केलं. 6 / 15पाकिस्ताननं चर्चेबाबत म्हटलं असलं तरी त्यांनी पुन्हा एकदा त्यासोबत एक अट घातली आहे. 7 / 15५ ऑगस्ट २०१९ च्या आपल्या निर्णयावर भारत जर पुन्हा विचार करणार असेल तर पाकिस्तान भारतासोबत चर्चा करण्यास तयार असल्याचं कुरैशी म्हणाले. 8 / 15या दिवशी भारतानं जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम ३७० हटवत केंद्र शासित प्रदेश बनवला होता.9 / 15कुरैशी सध्या तुर्कस्थानच्या दौर्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी एका मुलाखतीत हे विधान केलं आहे. 10 / 15'जर भारत ५ ऑगस्ट २०१९ रोजीच्या आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास तयार असेल तर पाकिस्तानला त्यांच्याशी चर्चेच्या माध्यमातून समस्या सोडवण्यास खूप आनंद होईल,' असं ते म्हणाले. 11 / 15पाकिस्तानने अनेकदा भारताशी युद्धाची धमकी दिली आहे. तथापि, मुलाखतीदरम्यान कुरैशींचा सूर पूर्णपणे बदलला होता. 12 / 15'आम्ही युद्धाची जोखीम उचलू शकत नाही. हे दोन्ही बाजूंसाठी आत्मघाती ठरेल आणि कोणतीही शहाणा व्यक्ती युद्धाची बाजू घेणार नाही. म्हणून आम्हाला एकत्र बसून चर्चा करण्याची गरज आहे,' असंही ते म्हणाले.13 / 15दरम्यान, पाकिस्तान नाही, तर भारत चर्चेपासून पळ काढत असल्याचा आरोप कुरैशी यांनी केला. 14 / 15तसंच ५ ऑगस्ट २०१९ रोजी भारतानं घेतलेला निर्णय हा आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावांच्या विरोधातील असल्याचं कुरैशी म्हणाले. 15 / 15यापूर्वी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं भारताला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आणखी वाचा Subscribe to Notifications