शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Pakistan vs Bangladesh: आज बांग्लादेश कुठे अन् पाकिस्तान कुठे? 1971 ला भारताने वेगळा केला नसता तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 9:10 AM

1 / 10
ढाका : भारताने बांग्लादेशला पाकिस्तानपासून वेगळे केले, १९७१ मध्ये युद्धात पाकिस्तानने शरणागती पत्करली आणि बांग्लादेश सुटला. कारण आज जर बांग्लादेशही पाकिस्तानमध्ये असता तर भिकेला लागला असता. परंतू आज बांग्लादेशी भारताचे आभार मानत असतील कारण तेथील स्थिती पाकिस्तानपेक्षा खूपच चांगली बनलेली आहे.
2 / 10
रशिया आणि युक्रेनच्या युध्दामुळे बांग्लादेशलाही झळ बसलेली आहे. परंतू एवढी नाही की पाकिस्तानसारखी स्थिती होईल. बांग्लादेशचा जीडीपी पाकपेक्षा अधिक आहे, तर महागाई देखील कमी आहे. आर्थिक संकट असले तरी पाकिस्तानच्या स्वप्नातही नसतील एवढे परकीय चलन बांग्लादेशकडे आहे.
3 / 10
१९९० च्या दशकात पाकिस्तान भारताशी तुलना करायचा. तेथील अनेकांना वाटायचे की पाककडे अशी संसाधने आहेत, ज्याद्वारे भारतापेक्षा जास्त स्तरावर आपण जाऊ शकू. हे दोन्ही देश कसे पुढे वाटचाल करतील, यावरही जगात चर्चा सुरु झाली होती. कारण तेव्हा दोन्ही देशांचा जीडीपी समानच होता. तसेच आर्थिक विकासाचे आकडे थोडे मागेपुढे होते. भारतीय रुपया मजबूत होता, परंतू पाकिस्तानच्या आवाक्यात होता.
4 / 10
अवघ्या दोन दशकात चित्र बदलले. आता पाकिस्तानची भारताशी तुलना होऊच शकत नाहीय, परंतू बांगलादेशही त्याच्या पुढे गेला आहे. जो भाग पाकिस्तानपासून वेगळा होऊन देश बनला, तो भाग आता अर्थव्यवस्थेच्या बाबतीत त्याला टक्कर देऊ लागला आहे.
5 / 10
ज्या दोन टक्यावरून खिल्ली उडविली जाते, त्यातल्याच एका टक्याने पाकिस्तानला गुढगे टेकायला भाग पाडले आहे. बांगलादेशचे चलन टका आहे. 2008 पासून बांगलादेशचा टका मजबूत होत होता आणि पाकिस्तानचा रुपया कमजोर होत होता. बांगलादेश गुंतवणूकदारांची पसंती बनत असताना, दहशतवादामुळे पाकिस्तानला अपमानाला सामोरे जावे लागत होते.
6 / 10
पाकिस्तानी कापड कंपन्यांनी बांग्लादेशकडून शिकण्याची गरज असल्याचा सल्ला जर्मनीच्या सर्वात मोठ्या कापड कंपनीने दिला आहे. बांगलादेशच्या धर्तीवर सुरक्षेचे प्रमाण वाढवावे लागेल. पाकिस्तानने असे केले तर कदाचित कापड निर्यात वाढू शकेल, असेही म्हटले आहे.
7 / 10
जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, 1971 पासून बांगलादेशचा जीडीपी $ 8.75 अब्ज वरून 2021 मध्ये $ 416 अब्ज झाला आहे. तर पाकिस्तानचा जीडीपी २०२१ ला $ 346 अब्ज होता. 1971 मध्ये हा आकडा 10.67 अब्ज डॉलर एवढा होता.
8 / 10
बांगलादेशात दरडोई उत्पन्न 2503 डॉलर आहे आणि ते पाकिस्तानपेक्षा 60% पेक्षा जास्त आहे. पाकिस्तानमध्ये दरडोई उत्पन्न 1538 डॉलर आहे.
9 / 10
बांगलादेशकडे परकीय चलनाचा साठा सध्या $34 अब्ज आहे. पाकिस्तानकडे तर $3.67 अब्ज एवढीच परकीय गंगाजळी आहे. पाकिस्तानची लोकसंख्या 23.14 कोटी आहे तर बांगलादेशची लोकसंख्या 16.94 कोटी आहे.
10 / 10
बांगलादेशात आयुर्मान 73 वर्षे आहे, तर पाकिस्तानमध्ये 67 वर्षे आहे. बांगलादेशात ९६ टक्के लोकांच्या घरात वीज आहे, तर पाकिस्तानमध्ये हे प्रमाण ७५ टक्के आहे. या सगळ्याची तुलना करता आज पाकिस्तान कुठेय आणि बांग्लादेश कुठेय...
टॅग्स :Pakistanपाकिस्तानBangladeshबांगलादेश