शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दाऊदची 'गर्लफ्रेंड'महविश हयात, हनी ट्रॅपमधून पुन्हा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2023 8:09 PM

1 / 11
काही लोकप्रिय पाकिस्तानी अभिनेत्रींचा लष्कराने हनी ट्रॅपसाठी वापर केला होता. महविश हयातचे नावही या हिरोईनपैकी एक आहे, असा दावा पाकिस्तानचे निवृत्त लष्करी अधिकारी मेजर आदिल राजा यांनी केला आहे.
2 / 11
महविश हयातला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची गर्लफ्रेंड म्हणूनही ओळखले जाते. आता ही अभिनेत्री हनी ट्रॅप प्रकरणात पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
3 / 11
स्वतःचे YouTube चॅनल चालवणारे मेजर राजा यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. यात हनी ट्रॅप प्रकरणात चार 'टॉप मॉडेल आणि अभिनेत्री' सामील आहेत, असा दावा केला आहे.
4 / 11
हा व्हिडिओ काही वेळातच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. 'या व्हिडिओमध्ये ज्या अभिनेत्रींचा उल्लेख आहे त्या सजल अली, मेहविश हयात, माहिरा खान आणि कुब्रा आहेत, असा दावा केला आहे.
5 / 11
महविश हयातने या व्हिडिओवर आक्षेप घेत इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. 'काही लोक प्रसिद्धीसाठी माणुसकीच्या पातळीपेक्षाही खाली जातात. आशा आहे की तुम्ही तुमची दोन मिनिटांची प्रसिद्धी एन्जॉय करत असाल. फक्त कारण मी एक अभिनेत्री आहे' म्हणजे माझे नाव आहे, असं या पोस्टमध्ये लिहिले आहे.
6 / 11
महविशने पुढे लिहिले, ज्यांच्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नाही अशा व्यक्तीबद्दल बिनबुडाचे आरोप आणि टोमणे पसरवल्याबद्दल तुम्हाला लाज वाटते आणि जे यावर आंधळेपणाने विश्वास ठेवतात त्यांना आणखी लाज वाटते.
7 / 11
मी यापुढे माझ्या नावाची अशी बदनामी होऊ देणार नाही.
8 / 11
महविश ही वादात राहणारी अभिनेत्री आहे आणि ती अंडरवर्ल्ड डॉन आणि दहशतवादी दाऊद इब्राहिमची गर्लफ्रेंड असल्याची अफवाही पसरवली जात आहे.
9 / 11
महविशचे आणि दाऊद इब्राहिमसोबतचे संबंध 2019 मध्ये त्याला तमगा-ए-इम्तियाज हा पाकिस्तानचा नागरी पुरस्कार मिळाल्यानंतर सुरू झाला. महविश आणि दाऊदच्या वयात 27 वर्षांचा फरक आहे.
10 / 11
1988 मध्ये महविसचा जन्म झाला आहे. तिने कॉमेडी चित्रपटात काम केले आहे.
11 / 11
महविशने 'पंजाब नहीं जाऊंगी' (2017), 'लोड वेडिंग' (2018) आणि 'लंडन नहीं जाऊंगा' (2022) मध्येही काम केले आहे.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानDawood Ibrahimदाऊद इब्राहिम