pakistani politician hina rabbani khar has worthy style sense see pics
महागड्या बॅग्ज-ट्रेंडी ज्वेलरी; स्टायलिश आहेत पाकिस्तानच्या महिला नेत्या Hina Rabbani Khar, अभिनेत्रींना देतात टक्कर! By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 1:17 PM1 / 10एक काळ होता, तेव्हा असे म्हटले जायचे की स्त्रिया फक्त घरची कामे करण्यासाठी आणि कुटुंबाची सेवा करण्यासाठी आहेत. मात्र, आजच्या काळात स्त्रिया आपल्या शहरात किंवा देशातच नव्हे, तर जगभर राज्य करत आहेत. राजकारणापासून चित्रपटसृष्टीपर्यंत सर्वच क्षेत्रात महिला कार्यरत आहेत. यापैकी एक म्हणजे पाकिस्तानची सुपर गॉर्जियस पॉलिटिशियन हिना रब्बानी खार.2 / 10पाकिस्तानमध्ये सत्तांतर होऊन नवे सरकार स्थापन झाले. या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा सुरू झाल्यावर आपल्या सौंदर्यामुळे जगभरातील आकर्षणाचे केंद्र असलेल्या पाकिस्तानी राजकारणातील महिला नेत्या हिना रब्बानी खार यांचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.3 / 10पाकिस्तानसारख्या देशात जिथे पुरुषांना प्रत्येक गोष्टीत समोर केले जाते, तिथे हिना रब्बानी खार यांनी पुरुषांना मागे टाकत राजकारणात मोठे स्थान मिळवले आहे. हिना रब्बानी खार या पाकिस्तानच्या राजकारणातील लोकप्रिय चेहरा आहेत. पाकिस्तानातच नव्हे, तर जगभर त्यांची ओळख आहे.4 / 10पाकिस्तानच्या नव्या शाहबाज शरीफ सरकारमध्ये हिना रब्बानी खार यांना मंत्री केले जात आहे. यापूर्वी हिना रब्बानी खार 2011 ते 2013 पर्यंत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री होत्या. हे मंत्रिपद मिळालेल्या हिना या पाकिस्तानमधील पहिल्या महिला राजकारणी होत्या. इतकेच नाही तर सर्वात कमी वयात हे मंत्रिपद मिळवण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.5 / 10पाकिस्तानच्या हिना रब्बानी खार परराष्ट्र मंत्री असताना त्यांनी भारताचा दौराही केला होता. हिना रब्बानी खार यांच्या त्या दौर्याचीही बरीच चर्चा झाली, विशेषत: त्यांच्या लुक आणि फॅशनबद्दल. हिना रब्बानी खार केवळ राजकारणातच टॉपर नाही तर फॅशनच्या बाबतीतही त्या आपल्या देशातील अभिनेत्रींना टक्कर देतात. 6 / 10हिना रब्बानी खार यांना पाकिस्तानमध्ये स्टाइल आयकॉन म्हटले जाते. त्यांच्या बॉडी लँग्वेजपासून ड्रेसिंग सेन्सपर्यंत सर्व काही सुपर क्लासी आहे.हिना रब्बानी खार यांची प्रत्येक शैली युनिक आहे. सूट-सलवारमध्येही त्या स्वत:ला अतिशय आत्मविश्वासाने सांभाळतात. त्यांच्या सूट्सपासून सनग्लासेस आणि बॅगपर्यंत सर्व काही चर्चेत असते.7 / 10हिना रब्बानी खार यांनी भारताला भेट दिली होती, तेव्हा त्यांनी स्टायलिश पद्धतीने सलवार सूट घालून राजकारण्यांची साधी आणि नॉन-स्टायलिश प्रतिमा मोडून आपल्या जबरदस्त लुकने खूप हवा केली होती. त्यांच्या स्टाईलचे सगळेच चाहते झाले होते.8 / 10हिना रब्बानी खार या फॅशन आणि ट्रेंडकडे पाहून आपल्या हेअरस्टाइलपासून हेअर कलरपर्यंत सर्व गोष्टींना अंतिम रूप देतात. त्या नेहमी डोक्यावर दुपट्टा घातलेल्या दिसतात. ट्रेंडी नेकपीस आणि सूटसोबत जुळणारे कानातले घालून आपल्या लुकमध्ये आकर्षण वाढवायला त्या कधीच विसरत नाही. त्यांचे दागिने साधे असले तरी ट्रेंडी आणि सुपर स्टायलिश आहेत, जे त्यांच्या राजकारणी प्रतिमेला साजेशे आहेत.9 / 10हिना रब्बानी खार यांचे बॅग्सबद्दलचे प्रेम आणि आकर्षणही कोणापासून लपलेले नाही. त्यांच्या प्रत्येक लूकसोबत त्या नक्कीच महागडी ब्रँडेड बॅग घेऊन जातात. भारत दौऱ्यादरम्यान हिना रब्बानी खार यांनी 7 लाखांची डिझायनर बॅग कॅरी केली होती, ज्याची खूप चर्चा झाली होती. 10 / 10हिना रब्बानी खार यांना Louis Vuitton, Ferragamo, Prada यांसारख्या महागड्या आणि लक्झरी ब्रँडच्या बॅग्ज आवडतात. 85 हजारांपासून लाखांपर्यंतच्या किंमती असलेल्या या ब्रँड्सच्या बॅग घेऊन त्या अनेक प्रसंगी दिसल्या आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications