pakistani soldiers being stopped by taliban from fencing border afghanistan
सीमा वादावरून पाकिस्तान आणि तालिबान भिडले; सीमेवर गोळीबार By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2021 2:39 PM1 / 9पाकिस्तान सुरुवातीपासूनच अफगाणिस्तानातील तालिबानला पाठिंबा देत होता, पण आता तालिबानच पाकिस्तानसमोर उभा ठाकला आहे. तालिबानी सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याला दोन्ही देशांच्या सीमेवर सुरक्षा कुंपण बांधण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. 2 / 9अफगाण अधिकाऱ्यांनी यासंदर्भातील माहिती दिली. जगभरातील इस्लामी देश अफगाणिस्तानतील नागरिकांच्या हक्कांबाबत चर्चा करण्यासाठी इस्लामाबादमध्ये जमले असताना दोन्ही देशांमधील सीमेवरील हा वाद चव्हाट्यावर आला आहे.3 / 9अफगाणिस्तानातील सरकारच्या विरोधाला न जुमानता पाकिस्तानने सर्वाधिक २,६०० किमी सीमेवर कुंपण घातलं आहे. पाकिस्तानने ज्या भागात कुंपण घातलं आहे, त्या ठिकाणी ब्रिटिशकालीन सीमांकनालाही आव्हान देण्यात आले. हे कुंपण दोन्ही बाजूंच्या कुटुंबांना विभाजित करतो.4 / 9या सीमेवरील घालण्यात आलेलं कुंपण हे 'बेकायदेशीर' असल्याचे अफगाण संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इनायतुल्ला खावरझामी यांनी सांगितले की, तालिबानी सैन्याने पाकिस्तानी सैन्याला नांगरहारच्या पूर्व प्रांतात 'बेकायदेशीर' कुंपण घालण्यापासून घेरण्यापासून रोखले होते. रविवारी ही घटना घडली. 5 / 9आता सर्व काही सामान्य असल्याचे सांगत सीमेवरील वादाच्या घटनेवर अधिक बोलणं त्यांनी टाळलं. त्याचवेळी यासंदर्भात पाकिस्तानी लष्कराला विचारणा केली असता त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.6 / 9सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तालिबानी सैनिक पाकिस्तानी सैनिकांकडून काटेरी तारांचे बंडल जप्त करताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये, एक वरिष्ठ अधिकारी सुरक्षा चौक्यांवर तैनात असलेल्या पाकिस्तानी सैनिकांना पुन्हा सीमेवर कुंपण घालण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा देताना दिसत आहे.7 / 9दोन्ही देशातील सीमेवरुन तालिबान आणि पाकिस्तानी लष्कर एकमेकांसमोर उभे ठाकले होते आणि त्या ठिकाणची स्थिती तणावाची होती, अशी माहिती दोन तालिबानी अधिकाऱ्या पाकिस्तानी न्यूझ वेबसाईट डॉनला नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.8 / 9पाकिस्तानकडून अफगाणिस्तानातील सीमाभाग कुनार प्रांतात गोळीबारी करण्यात आली. परंतु सीमावादावरु की अन्य कोणत्या कारणावरुन गोळीबार करण्यात आला हे अद्याप स्पष्ट नाही. गोळीबारीनंतर अफगाण सैन्य हेलिकॉप्टरच्या मदतीनं प्रांतात गस्त घालत आहे, असंही त्या दोन अधिकाऱ्यांनी सांगितलं.9 / 9यापूर्वी अमेरिका समर्थित अफगाण सरकार आणि पाकिस्तान यांच्यातील संबंबध ठीक नव्हते. यामुळे सीमाभागावर तारांचं कुंपण घालण्याचं काम सुरू करण्यात आलं होतं. परंतु अफगाणिस्तानातील सत्तेची सूत्रं तालिबानच्या हाती गेल्यानंतरही पाकिस्तानकडून हे काम सुरूच होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications