शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

संपूर्ण जगाला चिंतेत टाकून चीन काय करतोय पाहा; संताप आल्यावाचून राहणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 10:15 AM

1 / 11
संपूर्ण जगात कोरोनानं हाहाकार माजवला आहे. जगभरातील कोरोना बाधितांचा आकडा सव्वा दोन कोटींच्या आसपास पोहोचला आहे. तर मृतांची संख्या पावणे आठ लाखांच्या पुढे गेली आहे.
2 / 11
चीनच्या वुहानमधून कोरोनाचा विषाणू संपूर्ण जगात पोहोचला. युरोप, अमेरिका, ब्राझीलनंतर आता भारतात कोरोनानं अक्षरश: थैमान घातलं आहे. भारतातील कोरोना बाधितांचा आकडा २७ लाखांच्या पुढे गेला आहे. तर मृतांची संख्या ५० हजारांहून अधिक आहे.
3 / 11
कोरोनाचा फैलाव वाढत असल्यानं जगात अनेक ठिकाणी लॉकडाऊन सुरू आहे. घराबाहेर पडताना मास्क लावण्याची गरज भासत आहे. फिजिकल डिस्टन्सिंग पाळलं जात आहे. वारंवार हात धुतले जात आहे. मात्र दुसरीकडे ज्या वुहानमधून कोरोना पसरला, तिथे यातलं काहीच होत नाहीए.
4 / 11
गेल्या वर्षी वुहानमधून कोरोनाचा विषाणू जगभरात पोहोचला. सध्या वुहानमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये वुहानचे नागरिक पार्टी करताना दिसत आहेत.
5 / 11
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण जग मास्कचा वापर करत असताना, फिजिकल डिस्टन्सिंग पाळत असताना वुहानच्या पार्टीत यातलं काहीच दिसत नाही.
6 / 11
वुहानच्या माया बीच वॉटर पार्कमध्ये एका इलेक्ट्रॉनिक म्युझिक फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये शेकडो जण सहभागी झाले होते.
7 / 11
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, म्युझिक फेस्टिवलवेळी वॉटर पार्कमध्ये उपस्थित असलेल्यांची प्रमाण पार्कच्या एकूण क्षमतेच्या ५० टक्के होती. याशिवाय महिलांना ५० टक्क्यांची सूट देण्यात आली होती.
8 / 11
पार्कमध्ये उपस्थित असलेल्या काहींनी लाईफ जॅकेट घातलं होतं. मात्र कोणीही मास्क घातलेला नव्हता.
9 / 11
संपूर्ण जग चिंतेत असताना वुहानचे नागरिक मात्र आनंद अनुभवत होते. गेल्या वर्षी कोरोनाचा पहिला रुग्ण वुहानमध्ये सापडला.
10 / 11
कोरोना रुग्ण सापडताच १ कोटीपेक्षा अधिक लोकसंख्या असलेलं वुहान शहर लॉकडाऊन करण्यात आलं. जवळपास ७६ दिवस शहरात लॉकडाऊन सुरू होता.
11 / 11
जूनमध्ये वुहानमधील लॉकडाऊन संपला. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आल्यानं स्थानिक प्रशासनानं अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी शहरात लागू असलेले निर्बंध हटवले.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या