Petrol Diesel: Petrol price has gone up by Rs 50 in neighboring India sri lanka
Petrol Diesel: भडका... भारताशेजारील 'या' देशात 50 रुपयांनी महागलं पेट्रोल By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 8:46 PM1 / 9देशातील पाच राज्यांचे निवडणूक निकाल समोर आल्यानंतर, पेट्रोल आणि डिझेल महाग होणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. मात्र, देशात पेट्रोल स्वस्त झाले आहे. 2 / 9देशातील काही शहरांमध्ये पेट्रोलचे दर अगदी एक रुपया प्रतिलीटरने कमी झाले आहेत. खरे तर, रशिया-युक्रेन युद्धादरम्यान, कच्च्या तेलाच्या किंमती सातत्याने वाढत आहेत.3 / 9याच दरम्यान, भारताशेजारी देश असलेल्या श्रीलंकेत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. इंडियन ऑईल स्थिती श्रीलंकेतील कंपनीने देशाला झटका दिला आहे. 4 / 9श्रीलंकन चलनाची मोठी घसरण झाल्याने येथील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. वाढ करण्यात आलेले दर शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू होत आहेत. गेल्या महिनाभरात तिसऱ्यांदा कंपनीने दर वाढवले आहेत. 5 / 9लंका इंडियन ऑईल कंपनीने (एलआयओसी) झिझेलच्या किंमतीत 75 आणि पेट्रोलच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे, येथे डिझेल 254 रुपये प्रतिलिटर आणि पेट्रोल 214 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. 6 / 9एलआयओसी कंपनीचे व्यवस्थापक मनोज गुप्ता यांनी म्हटले की, गेल्या 7 दिवसांत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत श्रीलंकेतील चलन 57 रुपयांनी घसरले आहे. त्यामुळे, तेल आणि गॅस यांसारख्या वस्तूंवर त्याचा परिणाम झाला आहे. 7 / 9दरम्यान, रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळेही पश्चिमी देशांनी रुसवर प्रतिबंध लादले आहेत. त्यामुळेही, कच्चे तेल आणि गॅसच्या किंमतीत वाढ होत आहे. 8 / 9दरम्यान, कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असतानाच, पेट्रोलचे दर 12 ते 16 रुपये प्रतिलीटरपर्यंत वाढतील, असा अंदाज जाणकार व्यक्त करत होते. मात्र, भारतात दर कमी झाल्याने ग्राहक खुश दिसत आहेत.9 / 9भारतातील मेट्रो शहरांमध्ये काहीही बदल नाही - मेट्रो शहरांमध्ये तेलाच्या किंमतीत कसलाही बदल दिसून आला नाही. नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई आणि बेंगळुरूमध्ये हा दर अनुक्रमे, 95.41, 104.67, 109.98, 91.43, आणि 101.40 रुपये प्रति लीटरवर जैसेथे आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications