Coronavirus : वाढत्या रुग्णसंख्येदरम्यानच मोठा दिलासा, Omicron Vaccine मार्चपर्यंत तयार होण्याची शक्यता By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2022 9:33 AM1 / 9गेल्या काही दिवसांपासून जगभरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या समोर येत आहे. कोरोना रुग्णांचा खाली येत असलेला आलेख, आता पुन्हा एकदा वर जाऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांत अमेरिका, ब्रिटन आणि अन्य देशांमधून धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे.2 / 9भारतासह जगभरातील अनेक देशआंमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमायक्रॉन (Omicron Variant) झपाट्यानं पसरताना दिसतोय. हा धोका पाहता अनेक देशांनी आपल्या देशातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे (Coronavirus Vaccines) बूस्टर डोस देण्याची तयारी सुरू केली आहे.3 / 9ओमायक्रॉनचा प्रसार थांबवण्यासाठीही लस विकसित करण्यावर सध्या काम सुरू आहे. दिग्गज फार्मा कंपनी फायझरनं (Pfizer) ओमायक्रॉन विरोधात तयार करण्यात येणारी लस मार्च महिन्यापर्यंत तयार होण्याची शक्यता वर्तवली आहे. कंपनीच्या प्रमुखांनी यासंदर्भातील माहिती दिली. 4 / 9कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामध्ये ज्यांनी लस घेतली आहे, त्यांचाही समावेश आहे. त्या लोकांनाही ओमायक्रॉनची बाधा होत आहे. सरकारकडून येणारी मोठ्या प्रमाणातील मागणी पाता फायझर लसीच्या उत्पादनावरही काम करत असल्याची माहिती फायझरचे मुख्य कार्यकारी अधइकारी अलबर्ट बौर्ला यांनी सीएनबीसीशी बोलताना दिली.5 / 9'ही लस मार्च महिन्यापर्यंत विकसित करण्यात येईल. याची आवश्यकता असेल किंवा नाही याची मला कल्पना नाही. परंतु याचा वापर कसा केला जाईल याची मला कल्पना आहे,' असंही बौर्ला म्हणाले.6 / 9आणखी एका मुलाखतीत मॉडर्नाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन बन्सेल यांनीदेखील लसीविषयी माहिती दिली. 'कंपनी एका बूस्टरवर काम करत आहे. ही लस ओमायक्रॉन आणि अन्य स्ट्रेनचा सामना करू शकेल. संभाव्य बूस्टरसाठी जगभरातील आरोग्य तज्ज्ञांशी चर्चा करण्यात येत आहे,' असंही त्यांनी सांगितलं.7 / 9गेल्या वर्षी, फार्मा कंपनी फायझरने दावा केला होता की त्यांची कोरोना विरूद्ध तयार करण्यात आलेली प्रायोगिक गोळीदेखील कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरिअंट ओमायक्रॉनवर प्रभावी ठरली आहे. 8 / 9कंपनीने म्हटले होते की २,२५० लोकांवर केलेल्या संशोधनाच्या पूर्ण निष्कर्षाने पुष्टी केली आहे की तिची अँटी-कोविड गोळी विषाणूविरूद्ध प्रभावी आहे. 9 / 9कोरोनाच्या सुरुवातीच्या लक्षणांनंतर अधिक जोखीम असलेल्या प्रौढांना दिल्या जाणाऱ्या औषधामुळे हॉस्पिटलायझेशन आणि मृत्यूची संख्या सुमारे ८९ टक्क्यांनी कमी झाल्याचे सांगण्यात आले. आणखी वाचा Subscribe to Notifications