Pfizer's corona vaccine has Terrible side effects; feeling after injected to volentiers
Pfizer ची कोरोना लस टोचल्यावर कसे वाटले? व्हॉलंटिअर म्हणाले "भयानक साईडइफेक्ट" By हेमंत बावकर | Published: November 13, 2020 7:45 PM1 / 10काही दिवसांपूर्वी कोरोना व्हायरसवर 90 टक्के परिणामकारक लस बनविल्याची अमेरिकेच्या Pfizer ने केला होता. तसेच ही लस लवकरच लाँचही करण्याची घोषणा कंपनीने केली होती.2 / 10यावरून अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कंपनीने मुद्दामहून राष्ट्राध्यक्ष निवडणुकीपूर्वी लसीची घोषणा केली नसल्याचा आरोप केला होता. राजकीय वादानंतर आता कंपनीची लस पुन्हा एका मोठ्या संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. 3 / 10आता ही कोरोना लस घेतलेले स्वयंसेवक ही लस टोचल्यानंतर कसे वाटले याचे धक्कादायक खुलासे करू लागले आहेत. काही व्हॉलंटिअरनी सांगितले की, ही लस टोचल्यानंतर हँगओव्हर सारखे वाटत होते. 4 / 10डोके दुखी, ताप आणि स्नायूंचे, मांसपेशींचे दुखणे सुरु झाले होते. जसे की फ्ल्यूच्या लसीमध्ये जाणवते. लसीचा दुसरा टप्पा तर त्याहून गंभीर होता, असेही या स्वयंसेवकांनी सांगितले. 5 / 10चाचणीमध्ये सहभागी झालेल्या 44 वर्षांच्या ग्लेन डेशील्ड्स यांनी सांगितले की, लस टोचल्यानंतर हँगओव्हर झाला, मात्र लगेचच हे थांबले. 45 वर्षांच्या आणखी एका स्वयंसेवकाने सांगितले की, लस टोचल्यानंतर साईड इफेक्ट दिसून आले. दुसरा डोस दिल्यानंतर दुखण्याचे प्रमाण वाढले. 6 / 10फायझरच्या या लसीची चाचणी 6 देशांतील 43500 जणांपेक्षा अधिक स्वयंसेवकांवर घेण्यात आली आहे. तिसऱ्या टप्यातील ही आकडेवारी आहे. 7 / 10कोरोना लसीची चाचणी घेण्यासाठी आलेल्या लोकांना लस खरोखरीच टोचली की नाही ते माहित नव्हते. यापैकी निम्म्याच लोकांना कोरोना लस टोचण्यात आली होती. 8 / 10असे यासाठी करण्यात आले होते, कारण ग्रुपला इन्फेक्शनचा किती धोका आहे हे समजू शकेल. कोरोना लसीने काम केले की नाही ते यावरून लक्षात येते. 9 / 10फायझरची ही लस 90 टक्के परिणामकारक असली तरीही मोठे आव्हान म्हणजे ही लस लोकांपर्यंत पोहोचविणे आहे. कारण ही लस उणे 70 डिग्री सेल्सिअल तापमानात ठेवावी लागते. साध्या फ्रिजमध्ये ही लस 24 तासही टिकत नाही. 10 / 10ट्रायलमध्ये कोरोना लसीने त्रास दिला असला तरीही शेवटी निकाल चांगले आले आहेत. यामुळे कोरोना जगातून घालविण्यासाठी आशेचा किरण दिसू लागला आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications