शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

काय सांगता?; 'या' मुस्लीम देशाच्या नोटांवर आहे गणपती बाप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 8:45 PM

1 / 6
लाडक्या गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे. कोरोनाची भीती मागे सारत गर्दी टाळून सर्वांनी बाप्पांचे स्वागत केले आहे. सर्वांचा लाडका म्हणून गणरायाला ओळखलं जातं. मात्र तुम्हाला माहिती आहे का आपला लाडक्या गणपती बाप्पाचा फोटो एका देशामधील नोटांवर छापण्यात आला आहे.
2 / 6
जगात एक असा देश आहे तोही मुस्लीम देश ज्या देशातल्या नोटांवर गणपती बाप्पाचा फोटो छापण्यात आला आहे. तो देश म्हणजे इंडोनेशिया.
3 / 6
इंडोनेशियामधल्या नोटेवर गणपतीचा फोटो छपाण्यात आला आहे. इंडोनेशिया देशातला व्यवहार हा रुपयांमध्येच होतो. इंडोनेशियामधील २० हजार रुपयाच्या नोटेवर पुढच्या बाजूला गणपती बाप्पाचा फोटो आहे. तर मागच्या बाजूला क्लासरुमचा फोटो आहे.
4 / 6
नोटेवर इंडोनेशियाचे पहिले शिक्षण मंत्री हजर देवांत्रा यांचाही फोटो आहे. काही वर्षांपूर्वी इंडोनेशियाची अर्थव्यवस्था ढासळली. त्यानंतर २० हजाराची नोट चलनात आणण्याचा निर्णय झाला. या नंतर नोटांवर गणपतीचा फोटो छापण्याचाही निर्णय झाला.
5 / 6
येथील लोकांचे म्हणणे आहे की जेव्हापासून नोटेवर गणपतीचा फोटो छापण्यात आला तेव्हापासून देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाली. इंडोनेशियात मुस्लीम लोक मोठ्या प्रमाणावर आहेत.
6 / 6
या देशात हिंदूंचे प्रमाण अवघे ३ टक्के आहे. या देशातल्या २० हजाराच्या चलनी नोटांवर गणपती बाप्पाचा फोटो आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे गणपतीला या देशात कला, विज्ञान, शिक्षण याची देवता मानले जाते.
टॅग्स :IndonesiaइंडोनेशियाGanesh Mahotsavगणेशोत्सव