शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

बापरे, लहान मुलांचा एक्स रे असा काढतात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 12:58 PM

1 / 5
सोशल मिडीया चॅंलेजमध्ये लोकं नेहमी अजब-गजब कारनामे करत असताना पाहायला मिळतात. त्यात काही कृत्य तर माणुसकीला काळीमा फासणारी असतात. सोशल मिडीयाच्या क्रेझमध्ये लोकांनी लहान मुलांनाही सोडलं नाही.
2 / 5
अशाचप्रकारे सोशल मिडीयावर लहान मुलांचे काही फोटो व्हायरल होतायेत. जे फोटो पाहून तुम्हाला राग अनावर होईल. मात्र ज्यावेळी याचं खरं कारण तुम्हाला समजेल तेव्हा पोट धरून हसायला लागाल.
3 / 5
या मुलांना पारदर्शी असलेल्या एक्स रे ट्युबमध्ये टाकण्यात आलं आहे. त्यांची स्थिती पाहून तुम्ही हसाल. या मशीनला Pigg O Stat या नावाने ओळखलं जातं. सन 1960 मध्ये पहिल्यांदा बालरोगतज्ज्ञांनी या मशीनला पसंती दिली होती.
4 / 5
या मशीनचा वापर लहान मुलांचे एक्स रे काढण्यासाठी वापरलं जातं. माऊजी मान या ट्विटर युजरने या लहान मुलांचे फोटो ट्विट केलेत. त्यानंतर सोशल मिडीयात हे फोटो व्हायरल झालेत.
5 / 5
लहान मुलांचा एक्स रे नेमका कसा काढला जातो ते यानिमित्ताने समजलं असल्याचं माऊजीने सांगितले. आत्तापर्यंत 1 लाख 40 हजार पेक्षा अधिक लोकांनी या ट्विटला रिट्विट केलं आहे.
टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर