शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोसादने दोन महिन्यांपूर्वीच बॉम्ब इराणमध्ये नेलेला, हानिया कधी ना कधी येणार... असा संपवला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2024 10:24 AM

1 / 9
गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेले इस्त्राइल आणि हमास यांच्यातील युद्ध अजूनही सुरुच आहे. या युद्धात आतापर्यंत अनेक नागरिकांचा मृत्यू झालाय. आतापर्यंत इस्त्राइलने हमासच्या अनेक बड्या नेत्यांचा खात्मा केलाय. काही दिवसापूर्वी हमासचे बडे नेते इस्माइल हानिया यांची इस्त्राइलने इराणमध्ये हत्या केली. या हत्येची जगभरात चर्चा सुरू आहे, या हत्येचे प्लॅनिंग इस्त्राइलने सहा महिन्यांपूर्वीच केले होते.
2 / 9
इराणचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी हमास प्रमुख इस्माइल हानिया तेहरानला गेले होते. इराणी आर्मी आयआरजीसीच्या गेस्टहाऊसमध्ये त्यांची हत्या करण्यात आली. तिथे ज्या बॉम्बने हल्ला केला तो बॉम्ब दोन महिन्यांपूर्वीच तेहरानमध्ये आणण्यात आला होता.
3 / 9
इस्माईल हनिया याच्या हत्येसाठी रिमोट कंट्रोल्ड बॉम्बचा वापर करण्यात आला होता. दोन महिन्यांपूर्वी हानिया ज्या खोलीत राहात होता, त्याच खोलीत त्याला तेहरानच्या गेस्टहाऊसमध्ये ठेवण्यात आले होते.
4 / 9
इराणच्या लष्कराच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या दोन सदस्यांसह अनेक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने ही माहिती देण्यात आली आहे. हा नवा खुलासा क्षेपणास्त्र हल्ल्यात हनियाचा मृत्यू झाल्याच्या प्राथमिक अहवालापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.
5 / 9
या अहवालात काही इराणी अधिकाऱ्यांचा हवाला देत सांगितलं आहे की, तेहरानमध्ये हानियाची हत्या ही IRGC साठी मोठी लाजिरवाणी बाब आहे, कारण हानिया आणि इतर मान्यवर ज्या अतिथीगृहात थांबले होते ते ते चालवत आहेत. हानिया तेहरानमधील नेशात नावाच्या IRGC कंपाउंडमध्ये राहत होते. या कंपाऊंडचा वापर गुप्त बैठकांसाठी आणि हानियासारख्या उच्च प्रोफाइल पाहुण्यांसाठी बनवण्यात आला आहे.
6 / 9
हानियाचा मृत्यू बॉम्बस्फोटामुळे झाला, असं आयआरजीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हा बॉम्ब रिमोट कंट्रोलचा होता. गेस्टहाऊसच्या कंपाउंड वॉलचा काही भाग कोसळला, खिडक्यांच्या काचा फुटल्या. या स्फोटामुळे, हनिया थांबलेल्या बाजूच्या खोलीचं नुकसान झालं नाही. त्या खोलीत पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादचा नेता झियाद नखलेह हा होता. त्याला कोणताही इजा झाली नाही, यावरुन हानियाची हत्या नियोजित होता असं लक्षात येते.
7 / 9
स्थानिक वेळेनुसार पहाटे २ वाजता हानियाच्या खोलीत बॉम्बस्फोट झाला. कंपाऊंडचे वैद्यकीय कर्मचारी तेथे पोहोचले. हानियाला जागीच मृत घोषित करण्यात आले. हानियाच्या अंगरक्षकालाही मृत घोषित करण्यात आले. हमासचे वरिष्ठ अधिकारी खलील अल-हया हेही घटनास्थळी पोहोचले, त्यांनी हानियाचा मृतदेह पाहिला. यानंतर, IRGC चे कुड्स फोर्स कमांडर इस्माइल घनी यांनी ताबडतोब इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना याची माहिती दिली.
8 / 9
एका अधिकाऱ्याने अहवालात म्हटले आहे की, अशा स्फोटासाठी अनेक महिन्यांचे नियोजन केले जाते. हा बॉम्ब हानियाच्या खोलीत कसा आणि कधी आणला याची कोणालाही माहिती नव्हती. पण इराणच्या काही अधिकाऱ्यांनी सांगितले की हा बॉम्ब दोन महिन्यापूर्वीच आणला असावा.
9 / 9
हा बॉम्ब रिमोट कंट्रोलने चालवण्यात आल्याचे दिसते. २०२० मध्ये इराणी अणुशास्त्रज्ञ मोहसेन यांच्या हत्येसाठी इस्रायलच्या मोसादने असाच बॉम्ब वापरला होता. पण इस्रायलने या हल्ल्याला दुजोरा किंवा नाकारलेही नाही. यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी इराणच्या लष्कराला इस्रायलवर हल्ला करण्याचे आदेश दिले. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या तातडीच्या बैठकीनंतर खमेनी यांनी या हल्ल्याचे आदेश दिले होते.
टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धInternationalआंतरराष्ट्रीय