PM Modi emotional while paying tribute to children killed in russia ukrain war
मिठी मारली, खांद्यावर हात ठेवला अन्...; युद्धात जीव गमावलेल्यांना श्रद्धांजली वाहताना PM मोदी भावूक By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 5:10 PM1 / 7दोन दिवसांच्या पोलंड दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज युक्रेनमध्ये पोहोचले आहेत. येथे त्यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली.2 / 7पंतप्रधान मोदींनी यापूर्वी मॉस्कोला भेट दिली होती आणि या भेटीनंतर सहा आठवड्यांनंतर ते युक्रेनला पोहोचले आहेत. १९९१ मध्ये युक्रेनला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच युक्रेन भेट आहे.3 / 7पंतप्रधान मोदींनी युक्रेन गाठून राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी आणि झेलेन्स्की यांनी हस्तांदोलन आणि मिठी मारून एकमेकांचे स्वागत केले.4 / 7त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी राजधानी कीव येथे शहीद झालेल्या मुलांना आणि त्यांच्या स्मृतीला श्रद्धांजली वाहिली. यावेळी दोन्ही नेत्यांनी शहीद झालेल्या मुलांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला. यावेळी दोन्ही देशांचे प्रमुख भावुक झालेले दिसले. 5 / 7या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष आणि त्याचे परिणाम यावर चर्चा केली. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदींना युक्रेनमधील सद्यस्थितीची माहिती दिली.6 / 7या भेटीत युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान मोदींना युद्धग्रस्त युक्रेनचे भीषण असे फोटो दाखवले. यावेळी पंतप्रधान मोदी झेलेन्स्की यांना धीर देताना दिसले.7 / 7याआधी पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना मिठी मारली आणि त्यांची भेट घेतली तेव्हा झेलेन्स्कींनी त्यांच्यावर टीका केली होती. यामुळे प्रचंड निराशा झाली. सर्वात मोठ्या लोकशाहीच्या नेत्याने पुतीन यांना मिठी मारताना पाहून धक्काच बसला, असं झेलेन्स्कींनी म्हटलं होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications