शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मोदींनी दोन 'खास' माणसांना लडाखपासून दूर ठेवले अन् चीनचे टेन्शन वाढले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2020 9:04 PM

1 / 12
कोरोनामुळे संपूर्ण जगात टीकेचा धनी झालेल्या चीननं लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव अतिशय विचारपूर्वक वाढवला. जगाचं लक्ष कोरोनापासून दूर करण्यासाठी चीननं लडाखचा मुद्दा उपस्थित केला.
2 / 12
संपूर्ण जगाचं लक्ष कोरोनापासून हटवून भारत आणि चीनकडे यावं, यासाठी चीननं जाणीवपूर्वक लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर फौजफाटा वाढवला. मात्र चीनची योजना भारतानं धुळीस मिळवली.
3 / 12
लडाखमध्ये वाद निर्माण होताच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थीसाठी हात पुढे केला. मात्र हा द्विपक्षीय मुद्दा आहे. तिसऱ्या देशाच्या हस्तक्षेपाची गरज नाही, अशी स्पष्ट भूमिका भारतानं घेतली.
4 / 12
लडाख प्रश्न पूर्णपणे दोन देशांचा मुद्दा आहे, असा स्पष्ट संदेश भारतानं जगाला दिला. जवळपास महिना होऊन गेला तरीही प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील भारतीय जवान हटले नाहीत.
5 / 12
पंतप्रधान मोदी लडाखमधील तणाव दूर करण्यासाठी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर किंवा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना पाठवतील, अशी अपेक्षा चीनला होती. चीनच्या अपेक्षेवर भारतानं थंडगार पाणी ओतलं.
6 / 12
शत्रूला ज्याची अपेक्षा असते, तेच द्यायचं नाही, शत्रूला अपेक्षित गोष्टी करायच्या नाहीत, हा व्यूहनीतीचा, कुटनीतीचा नियम मोदींनी वापरला. त्यामुळे चीनला धक्का बसला.
7 / 12
चीननं १९६२ मध्ये भारताविरुद्ध युद्ध केलं. त्यावेळी तिथल्या सरकारची ग्रेट लीप योजना अपयशी ठरली होती. चिनी जनतेमध्ये निराशा होती. सरकारबद्दल रोष होता. त्यामुळेच चीननं भारताविरोधात युद्ध पुकारलं.
8 / 12
आता २०२० मध्ये संपूर्ण जगात चीनच्या विश्वासार्हतेला धक्का बसला आहे. चीनमुळेच कोरोना पसरला, चीननं कोरानाची माहिती जगाला फार उशिरा दिली, अशी ठाम भावना जगात आहे.
9 / 12
आपल्याबद्दल निर्माण झालेला अविश्वास दूर करायचा असल्यास कोरोनाचा विषय चर्चेतून दूर करावा लागेल, याची जाणीव चीनला आहे. त्यामुळेच चीननं जगाचं लक्ष विचलित करण्यासाठी लडाखचा मुद्दा उकरून काढला.
10 / 12
भारतानं अतिशय संयतपणे, संयमानं लडाखचा वाद हाताळला. भारतावर दबाव टाकल्यावर त्यांचं सैन्य मागे हटेल, लडाख परिसरातील लष्करी बांधकामं थांबतील, असा चीनचा होरा होता. तो सपशेल चुकला आहे.
11 / 12
चीननं लडाखमधील लष्करी कुमक वाढवताच भारतानं ५ हजार जवान तिथे तैनात केले. मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा पाठवला. बोफोर्स तोफा पाठवण्याची तयारी सुरू केली. याशिवाय लढाऊ विमानांसाठी धावपट्टी तयार करण्याच्या कामाला गती दिली.
12 / 12
भारत कोरोना संकटात आहे. त्यांची अर्थव्यवस्था संकटात आहे. त्यामुळे त्यांच्याकडून फारसं प्रत्युत्तर मिळणार नाही, असा चीनचा अंदाज होता. तो संपूर्णपणे चुकला आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनNarendra Modiनरेंद्र मोदीAjit Dovalअजित डोवाल