शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

जेव्हा ३० वर्षांपूर्वी साधं जॅकेट परिधान करुन जर्मनीला पोहोचले होते मोदी, पाहा PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2022 9:17 AM

1 / 9
पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी त्यांच्या युरोप दौऱ्याच्या पहिल्या दिवशी जर्मनीत होते. याच दरम्यान ३० वर्षांपूर्वीचा एक फोटो समोर आला आहे. जेव्हा ते जर्मनीमध्ये आले होते. त्यावेळी ते पक्षाचे कार्यकर्ते होते आणि अमेरिकेतून परतताना त्यांनी जर्मनी गाठलं होतं.
2 / 9
३० वर्षांपूर्वी जेव्हा पंतप्रधान मोदी जर्मनीला आले होते तेव्हाचा फोटो व्हायरल होत असून आज त्याच जर्मनीत मोदी भारताचे पंतप्रधान म्हणून पोहोचले आहेत.
3 / 9
जर्मनी दौऱ्यात पंतप्रधान मोदींचा यावेळी वेगळाच अंदाज पाहायला मिळाला. येथे त्यांच्या स्वागतासाठी ढोल-ताशे वाजवले जात होते. पंतप्रधान मोदींनी तेथील भारतीय नागरिकांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत काही वेळ व्यतित केला.
4 / 9
परदेशातील भारतीयांमध्ये पंतप्रधान मोदींबाबत मोठी क्रेझ आहे. त्याचंच दर्शन जर्मनीमध्येही पाहायला मिळालं. जर्मनीतील भारतीय नागरिक मोठ्या प्रमाणात मोदींसोबत सेल्फी टिपण्यासाठी उत्सुक होते.
5 / 9
21व्या शतकातील हा काळ भारतासाठी खूप महत्त्वाचा असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. आजच्या भारताने आपले मन बनवले आहे, तो निर्धाराने पुढे जात आहे. देश जेव्हा संकल्प करतो, तेव्हा तो नव्या वाटांवर चालतो आणि इच्छित उद्दिष्टे साध्य करून दाखवतो, असं मोदी म्हणाले.
6 / 9
विद्यार्थी, संशोधक आणि व्यावसायिकांसह भारतीय वंशाचे १६०० हून अधिक सदस्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला होता.
7 / 9
पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील जर्मनीत झालेलं त्याचं स्वागत पाहून भारावून गेले होते. त्यांनी सर्वांना अभिवादन करत आपला आनंद आणि आभार व्यक्त केले.
8 / 9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी आवर्जुन तेथील भारतीय नागरिक आणि लहान मुलांची भेट घेतली. त्यांच्यासोबत वेळ व्यतित करुन सेल्फी, ऑटोग्राफ देखील दिले.
9 / 9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी आवर्जुन तेथील भारतीय नागरिक आणि लहान मुलांची भेट घेतली. त्यांच्यासोबत वेळ व्यतित करुन सेल्फी, ऑटोग्राफ देखील दिले.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGermanyजर्मनी