pm narendra modi receives seoul peace prize know who gets before him
मोदींना सेऊल शांतता पुरस्कार, आतापर्यंत या महान व्यक्तींना केलं सन्मानित By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2019 9:02 PM1 / 6पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला. नरेंद्र मोदींनी पुरस्कारासोबत 1 कोटी 30 लाखांची रक्कम दिली आहे. पुरस्काराची रक्कम नमामि गंगा योजनेला देणार असल्याचं नरेंद्र मोदींनी जाहीर केलं आहे. कोरियाची राजधानी सेऊल येथे 24व्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजन झाल्याच्या निमित्ताने 1990 पासून सेऊल शांतता पुरस्कार दिला जातो. 2 / 6बांगलादेशातील अर्थशास्त्रज्ञ मुहम्मद युनूस यांना 2006मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता. 3 / 6संयुक्त राष्ट्रांचे माजी सरचिटणीस कोफी अन्नान यांना 1998ला या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. 4 / 6पाकिस्तानातल्या ईदी फाऊंडेशनचे संस्थापक अब्दुल सत्तार ईदी यांनाही 2008मध्ये हा पुरस्कार मिळाला होता. 5 / 6जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांचासुद्धा या पुरस्कारानं गौरव करण्यात आला होता. 6 / 6संयुक्त राष्ट्रांचे माजी प्रमुख असलेल्या बान की मून यांनाही हा पुरस्कार मिळाला होता. आणखी वाचा Subscribe to Notifications